साहित्य : 2 कप पायनेपल (काप केलेले), 1/2 चमचा जिरं, 1 लवंग, 1 तुकडा दालचिनी, 1 मोठी वेलची, मीठ चवीनुसार, 1/2 चमचा तिखट, 1/2 चमचा गरम मसाला, 1 कांदा, 1 हिरवी मिरची, 1 मोठा चमचा साखर, 2 मोठे चमचे तेल, कोथिंबीर, कढीपत्त ा, 1 मोठा चमचा क्रीम, 1/2 चमचा मोहरी.
कृती : सर्वप्रथम कांदा व हिरवी मिरची बारीक कापून घ्यावे. आत प्रेशर कुकरमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी-जिऱ्याची फोडणी द्यावी व त्यात लवंग, वेलची व दालचिनी घालून चांगले परतून घ्यावे. नंतर त्यात कांदे, हिरवी मिरची, कडीपत्ता गुलाबी होईपर्यंत परतावे. मग काप केलेले अननसचे तुकडे मीठ, तिखट व गरम मसाला घालून 2 मिनिट परतून त्यात 2 कप पाणी घालून कुकर बंद करून 5 मिनिट शिजवावे. भाजी शिजून झाल्यावर त्यात साखर घालावी व क्रीम व कोथिंबीर घालून गरम गरम सर्व्ह करावी. ही आंबट गोड भाजी फारच रुचकर लागते.