Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वदंशाने सापाने केली आत्महत्या

Webdunia
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017 (14:59 IST)
मेलबर्न- केवळ माणूसच नव्हे तर काही वेळा प्राणीही आत्महत्या करतात. या प्राण्यांमध्ये कुत्रे, कबुतर यांच्याबरोबरच आता विषारी सापांचाही समावेश करावा लागेल. गेल्या काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियात एका अत्यंत विषारी सापाने स्वदंशाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. 
 
या घटनेने सर्पतज्ज्ञही आश्चर्यचकित झाले असून ते आत्महत्येच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रामुख्याने ऑस्ट्रेलियात आढळणारे ट्री ब्राऊन या प्रजातीचे साप अत्यंत विषारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या दंशाने केवळ माणूस नव्हे तर मोठे प्राणीही तासाभरात मृत्युमुखी पडतात.

संबंधित माहिती

Show comments