Marathi Biodata Maker

मनमोहनच्‍या विजयाने अमेरिकेत जल्‍लोष

Webdunia
बुधवार, 23 जुलै 2008 (11:36 IST)
PTI
पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी भारतीय संसदेत विश्वासमत ठराव जिंकला असला तरीही त्‍यांच्‍या विजयाचा जल्‍लोष सातासमुद्रापार अमेरिकेतही व्‍यक्‍त केला जात आहे. डॉ.सिंग यांनी मिळविलेल्‍या विजयाचे कौतुक करीत अमेरिकेने आता या दोन्‍ही देशांमध्‍ये लवकरच अणू करारास गती मिळणार असल्‍याची अपेक्षा व्‍यक्‍त केली आहे.

भारतात अमेर‍िकेचे राजदूत असलेले डेविड मलफोर्ड यांनी मंगळवारी रात्री माध्‍यमांसाठी प्रसिध्‍दीस दिलेल्‍या एका पत्रकात डॉ.सिंग यांना विजयाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या असून अमेरिका दोन्‍ही देशातील अणू करारासाठी उत्‍सुक असल्‍याचे म्‍हटले आहे.

त्‍यांनी सांगितले, की आम्‍ही भारतासोबत आयएईए, एनएसजी आणि अमेरिकी कॉंग्रेसमध्‍ये या करारास लवकरात-लवकर मंजुरी मिळविण्‍यासाठी सोबत काम केले जाणार आहे.

आयएईएकडून यास मंजुरी मिळाल्‍यानंतर करार 45 सदस्यांच्‍या एनएसजीमध्‍ये पाठविला जाईल. आणि नंतर त्‍यास अमेर‍िकी संसदेत मंजुरीसाठी आणले जाणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

Maharashtra Local Body Election Result 2025 LIVE: महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल आज

महापालिका निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित! मंत्री बावनकुळे यांचा दावा

चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, वाघ अजूनही जिवंत आहे विजय वडेट्टीवार म्हणाले

महायुतीची एकतर्फी विजयाकडे वाटचाल, भाजप सर्वात मोठा पक्ष

रेल्वेने भाडेवाढीची घोषणा केली, एसी तसेच जनरल क्लासच्या किमती वाढल्या

Show comments