Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात ५,५३५ नवीन कोरोना रुग्णांची नोंद

Webdunia
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020 (10:23 IST)
राज्यात गुरुवारी ५,५३५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १७,६३,०५५ झाली आहे. राज्यात ७९,७३८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात १५४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४६,३५६ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.
 
राज्यात १५४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. यामध्ये मुंबई १२, ठाणे १३, वसई-विरार मनपा १४, नाशिक ८, पुणे ६, पिंपरी-चिंचवड मनपा ४, सोलापूर २५, सातारा १२, अमरावती ६, नागपूर ७ आणि अन्य राज्य १ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या १५४ मृत्यूंपैकी ६० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ५५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ५५ मृत्यू सोलापूर १५, ठाणे १२, पालघर ७, अमरावती ५, सातारा ५, नाशिक ३, पुणे ३, जळगाव २, औरंगाबाद १, सांगली १ आणि मध्य प्रदेश १ असे आहेत.
 
गुरुवारी ५,८६० रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १६,३५,९७१ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.७९ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ९९,६५,११९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,६३,०५५ (१७.६९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,६०,८६८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,२८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

वृद्ध महिलेची 2.3 कोटी रुपयांची फसवणूक एकाला अटक

भाजपने महाराष्ट्रासाठी पर्यवेक्षकांची नियुक्ती केली, निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी उद्या मुंबईला जाणार

LIVE: श्रीकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्र्यांशी संबंधित अफवा फेटाळल्या

1 कोटींची चोरी करणाऱ्या चोराला कुत्र्याने पकडले, पोलिसांचा मोठा खुलासा

मुंबईत हिट अँड रनमध्ये शिक्षिकाचा मृत्यू, 2 वर्षांची मुलगी बचावली

पुढील लेख
Show comments