Festival Posters

96 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह तर 301 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल

Webdunia
बुधवार, 6 मे 2020 (09:02 IST)
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 58, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 3, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 13, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 18 व ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 4 असे एकूण 96 जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
301 नागरिक विलगीकरण कक्षात दाखल
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 102, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 84, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 69 व ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथे 46 असे एकूण 301 नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
14 दिवसानंतर तपासणासाठी पाठविले घशातील स्त्रावांचे नमुने
रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या 22 बाधित रुग्णांचे 14 व्या दिवसानंतरचे घशातील स्त्रावांचे नमुनेही तपासणीसाठी बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे पाठविण्यात आले आहेत.
उपचार घेत असलेले बाधीत रुग्ण (कोविड-19)- 67, कोरोना मुक्त होवून घरी गेले रुग्ण- 11, कोरोना बाधित मृत्यु- 2 तसेच जिल्ह्यात आज पर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 80 इतकी आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र अर्थसंकल्पात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर

Maharashtra Budget 2026 फडणवीस सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार! अहिल्याबाई होळकर योजना जाहीर

महाराष्ट्राचा सुपुत्र लढाऊ विमान अपघातात शहीद

सनथ जयसूर्या लवकरच श्रीलंकेच्या क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सोडणार

मावळमध्ये शिवज्योत आणताना भीषण अपघात, दोन शिवभक्तांचा मृत्यू; परिसरात शोककळा

पुढील लेख
Show comments