Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सुधीर मुनगंटीवार, बच्चू कडू यांना कोरोनाची लागण

Webdunia
सोमवार, 21 सप्टेंबर 2020 (08:48 IST)
महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुनगंटीवार यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. 'माझी कोव्हिड 19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया प्रोटोकॉल चे पालन करून स्वतःची चाचणी करून घ्यावी ही विनंती,' अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विटर आणि फेसबुकवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी ही विनंती देखील त्यांनी केली आहे. 
 
राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वत:च्या ट्वीटर अकाऊंटवरुन त्यांनी ही माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्या सर्वानी आपली तपासणी करण्याचे आवाहन त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून केले आहे.  बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या पत्नी नयना कडू यांना देखील कोरोनाची लागण झाली. तसेच त्यांच्या कुटुंबातील एकूण बारा जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

केळवण आणि ग्रहमख

साखरपुड़ा सोहळा साहित्य आणि विधी जाणून घ्या

वैवाहिक जीवनातील समस्यांवर ज्योतिषीय उपाय

कडुलिंबाचे पाणी केसांसाठी वरदान आहे, अशा प्रकारे वापरा

उडदाची डाळ खाल्ल्याने शरीराला होतात हे 10 फायदे

सर्व पहा

नवीन

काकाला नोकरीवरून काढले, रागात पुतण्याने SRA पर्यवेक्षकाची चाकूने हत्या केली

फेरीवाल्यांकडून लाच घेणे पोलिसांना महागात पडले; व्हिडिओ व्हायरल, 4 कॉन्स्टेबल निलंबित

मराठी महाराष्ट्राची भाषा नाही... संघ नेते भैय्याजी जोशी यांच्या विधानाने राजकीय खेळ बिघडला, संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल

LIVE: बातम्यांच्या आशयावर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकार मीडिया सेंटर स्थापन करणार

विराट खेळत असताना अनुष्का झपकी घेताना दिसली VIDEO

पुढील लेख
Show comments