suvichar

कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ

Webdunia
गुरूवार, 2 जून 2022 (11:23 IST)
राज्यात  सध्या कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे. बुधवारी राज्यात १०८१ रुग्णांची नोंद झाली असून, मुंबईत ७३९ रुग्णांची नोंद झाली आहे. सध्यस्थितीतील ही रुग्णवाढ मोठी चार महिन्यानंतर सर्वात मोठी असल्याचे मानले जात आहे. तसेच, २४ फेब्रुवारीनंतरची महाराष्ट्रातील सर्वाधिक रुग्णसंख्या बुधवारी आढळली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यभरात निर्बंध लागणार का, यावर चर्चा रंगल्या आहेत.
 
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यासह देशभरातील सर्व नियम  शिथिल करण्यात आले. कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरणावरही भर देण्यात आला होता. परंतु, त्यानंतर सुद्धा कोरोनाने देशाच्या अनेक राज्यांमध्ये डोके वर काढले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात असून, सुरक्षेच्या दृष्टीने सरकारनेही काळजी घेण्याचे आव्हान केले आहे.
 
वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने (BMC) यासंदर्भातील माहिती जारी केली आहे. तर, गेल्या २४ तासात कोरोना संसर्गामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. मुंबईत सध्या २९७० सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. मुंबईत आतापर्यंत करोना संसर्गाच्या रुग्णांची संख्या १० लाख ६६ हजार ५४१ वर पोहोचली आहे. तर, १९५६६ रुग्णांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे. मुंबईत ४ फेब्रुवारी रोजी ८४६ करोना रुग्णांची नोंद झाली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

14 मार्च रोजी मसुरीमध्ये कुलदीप वंशिकासोबत लग्न करणार

एअर इंडियाने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान भाड्यात वाढ केली

LIVE: नागपुरात धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवण्याचे आदेश

मुक्ताईनगर जमीन अधिग्रहण प्रकरणात माजी मंत्री एकनाथ खडसे यांची चौकशी होणार, एसआयटी स्थापन

'इराणसोबतचे युद्ध मी जेव्हा इच्छितो तेव्हा संपेल', अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे मोठे विधान

पुढील लेख
Show comments