Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोना उपचार : कोरोनापासून वाचवणाऱ्या आणखी एका उपचार पद्धतीचा शोध

Webdunia
शनिवार, 19 जून 2021 (21:33 IST)
मिशेल रॉबर्ट्स
एका हलक्या प्रतीच्या स्टेरॉईडपासून बनवलेल्या औषधामुळे कोरोनापासून बचाव होऊ शकतो, हे गेल्या वर्षी आढळून आलं होतं. त्या औषधामुळे कित्येक नागरिकांचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं होतं.
 
त्यानंतर आता अशाच आणखी एका उपचार पद्धतीचा शोध लागल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे. मोनोक्लोनल अँटिबॉडी ट्रिटमेंट असं या उपचार पद्धतीचं नाव आहे.
 
हे थोडं महागडं आहे. शरीरात जळजळ होऊ न देता व्हायरसचा प्रभाव कमी करण्याचं काम त्याच्याकडून केलं जातं. या प्रक्रियेत शरीराच्या अंतर्गत अवयवांना सूज येत नाही.
रुग्णालयात दाखल असलेल्या तीनपैकी एका रुग्णासाठी हे उपचार उपयुक्त ठरू शकतात, असे निष्कर्ष समोर आले आहेत. तज्ज्ञांच्या मते, अतिगंभीर शंभर रुग्णांपैकी किमान 6 रुग्णांचे प्राण हे औषध वाचवू शकतं.
 
कुणाला होईल उपयोग?
कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी ज्या रुग्णांच्या शरीरात अँटीबॉडी बनल्याच नाहीत, अशा रुग्णांसाठी हे उपचार उपयोगी आहेत.याची किंमत 1 ते 2 हजार डॉलरच्या दरम्यान असेल, अशी माहिती मिळाली आहे.
किंबरले फिदरस्टोन (वय 37) या एका रुग्णालयात कोरोनाचे उपचार घेत होत्या. त्यांच्यावर या उपचार पद्धतीची चाचणी करण्यात आली.त्या सांगतात, माझ्यावर याची चाचणी घेण्यात आली, याबाबत मी स्वतःला खूप नशीबवान समजते. मी रुग्णालयात दाखल होते. पुढे काय होईल, मला कल्पना नव्हती. पण मला या उपचारांचा चांगला उपयोग झाला.या चाचणीत भाग घ्यायला मला आवडलं. हे उपचार उपयुक्त ठरल्याचं कळल्यानंतर मला खूप आनंद झाला, असं त्या म्हणाल्या.मोनोक्लोनल अँटिबॉडी ट्रिटमेंट ही रेजनरॉन यांच्याकडून बनवण्यात आली आहे.त्यामध्ये व्हायरसला इतर पेशींना संसर्ग करण्यापासून तसंच त्यांचे आणखी बाधित पेशी बनवण्यापासून रोखलं जातं.या चाचणीत युकेतील सुमारे 10 हजार कोरोना रुग्ण सहभागी झाले होते.
 
त्यातील निष्कर्षानुसार, या उपचारांमुळे
 
- मृत्यूचा धोका कमी झाला.
 
- रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेण्याची गरजही चार दिवसांनी कमी झाली.
 
- व्हेंटीलेटर किंवा श्वास घेण्यात अडथळे निर्माण होण्याचं प्रमाणही कमी झाल्याचं आढळून आलं.
 
संयुक्त मुख्य संशोधक सर मार्टिन लँड्रे सांगतात, "दोन अँटीबॉडीचं कॉम्बिनेशन असलेली ही उपचार पद्धत रुग्णांना दिल्यानंतर मृत्यूचा धोका 20 टक्क्यांनी कमी होतो."
 
उपचारातील अनिश्चितता
हे उपचार सूजरोधक स्टेरॉईट औषध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेक्सामेथेसॉनसोबत दिले जातात. डेक्सामेथेसॉनही गंभीर रुग्णांवर अत्यंत उपयुक्त आहे.
संशोधनातील आणखी एक मुख्य संशोधक सर पीटर हॉर्बी यांच्या मते, अँटीबॉडी थेरपी फायदेशीर आहे की नाही, याबाबत अनेक अनिश्चितता आहेत.काही अभ्यासांमध्ये त्यांचा काहीही उपयोग होत असल्याचंही दिसून आलं आहे.
 
उदाहरणार्थ, सुरुवातीला ब्लड प्लाझ्मा थेरपीही वापरली जात होती. ही थेरपी एक अँटीबॉडीयुक्त उपचार पद्धतच आहे. पण ही उपचार पद्धत पुढे प्रभावी असल्याचं सिद्ध होऊ शकलं नाही.
 
मात्र, यावेळी वापरण्यात आलेल्या उपचार पद्धतीत लॅबमध्ये बनवण्यात आलेल्या दोन विशिष्ट प्रकारच्या अँटीबॉडींचा वापर करण्यात आला आहे. त्यामध्ये या व्हायरसचा खात्मा करण्यासाठी उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे.
स्वतः अँटीबॉडी निर्माण करण्यात अयशस्वी ठरणाऱ्या रुग्णांसाठी ही उपचार पद्धत वरदान ठरू शकते. त्यामुळे मृत्यूदरही कमी होईल. त्याचे पूर्ण परिणाम दिसण्यासाठी आणखी काही वेळ थांबावं लागू शकतं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

राहुल गांधी यांच्या परभणी दौऱ्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

महाराष्ट्रातील मतदार यादीतील अनियमिततेच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने दिले उत्तर

LIVE: पालघरमध्ये वनविभागाच्या अधिकाऱ्यावर लाच मागितल्याचा आरोप,गुन्हा दाखल

पालघरमध्ये वनविभागाच्या अधिकाऱ्यावर लाच मागितल्याचा आरोप,गुन्हा दाखल

मेंढरमध्ये लष्कराचे वाहन कोसळले पाच जवानांचा मृत्यू,अनेक जवान जखमी

पुढील लेख