Dharma Sangrah

वाचा, डासांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो का?

Webdunia
सोमवार, 20 जुलै 2020 (07:57 IST)
पावसाळ्याच्या दिवसांत डासांमुळे डेग्यू, मलेरियासांरख्या आजारांचा धोका वाढतो. अशात अनेक लोकांमध्ये डासांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो का? अशा अनेक शंका उपस्थित होत आहेत. याबाबत शास्त्रज्ञांनी माहिती देत, डासांमुळे कोरोना संसर्ग होत नसल्याचं सांगितलं आहे. 
 
अमेरिकेतील कॅनसास स्टेट युनिव्हर्सिटीमधील  संशोधक स्टीफन हिग्ज यांनी सांगितलं की, जागतिक आरोग्य संघटनेने ठामपणे सांगितलं आहे की, डासांद्वारे विषाणूचा प्रसार होऊ शकत नाही. आम्ही केलेल्या अभ्यासानुसार, पहिल्यांदाच हा दावा सिद्ध करण्यासाठी आकडेवारी सादर केली गेली. विद्यापीठाच्या जैविक संवर्धन संशोधन संस्थेमध्ये केलेल्या अभ्यासानुसार, व्हायरस डासांच्या तीन सामान्य प्रजातींमध्ये प्रजनन करण्यास असमर्थ आहे आणि त्यामुळे व्हायरस डासांद्वारे माणासांपर्यंत पोहचू शकत नाही. 
 
शास्त्रज्ञांच्या मते, एखाद्या कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीला डास चावला, तरी त्या व्यक्तीच्या रक्तात असलेले कोरोना विषाणू डासांच्या आत जगू शकत नाही, म्हणूनच डास दुसर्‍या व्यक्तीला चावल्यास त्याला संसर्ग होण्याचा धोका नसतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

महाविकास आघाडीत फूट? अंबादास दानवे यांच्या उमेदवारीला काँग्रेसचा विरोध

महाराष्ट्र सरकारने रिक्षा-टॅक्सी चालकांना 'व्यावहारिक मराठी' शिकवण्यासाठी एक उपक्रम सुरू केला; मंत्रिमंडळ बैठकीत मार्गदर्शिका प्रकाशित

LIVE: महाराष्ट्राला दोन नवीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्या मिळाल्या

Exit Polls: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांनी बाजी पलटवली का?

Bhandara By-election 2026: ग्रामपंचायत पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर; सरपंच आणि सदस्यांच्या विजयाचा समर्थकांकडून जल्लोष

पुढील लेख