Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोविड-19 संसर्गाला सामान्य फ्लू समजू नका, तज्ञांचा इशारा

Webdunia
रविवार, 24 एप्रिल 2022 (14:14 IST)
सध्या कोरोनाने पुन्हा तोंड काढायला सुरु केले आहे. पुन्हा कोरोनाची प्रकरणे वाढत आहे. चीनच्या शांघाय मध्ये तर कोरोनामुळे काही रुग्ण दगावले आहे. कोरोनाला हंगामी व्हायरस म्हटले आहे. तज्ञांनी लोकांना सावध केले आहे की COVID-19 संसर्ग हा हंगामी फ्लू सारखाच आहे. यूएसमध्ये, डेल्टा एअरलाइन्सने प्रवाशांसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये कोविड-19 ला 'साध्या हंगामी व्हायरस' म्हटले आहे. याविषयीच्या चर्चेदरम्यान, तज्ञांनी म्हटले आहे की कोविड -19 संसर्ग काही प्रमाणात हंगामी आहे, हे खरे आहे, परंतु ते सामान्य नाही. तसेच ते फ्लूसारखे नाही. 
 
अमेरिकेत कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन वर्षांत अमेरिकेतील एक चतुर्थांश लोकसंख्येला कोविड-19 ची लागण झाली आहे. मात्र, खरी संख्या यापेक्षा कितीतरी जास्त असू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 
 
सध्या देशातील ईशान्येकडील राज्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. गेल्या दोन वर्षांत या राज्यांतूनही लाट सुरू झाली. त्यामुळे देशभरात कोरोनाची नवी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
 
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, कोविड-19 चा सामना करण्यासाठी लस खूप प्रभावी आहेत. 
यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, लसीकरण केलेल्या लोकांना कोविड-19 ची लागण झाल्यास रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता दहापट कमी असते. ज्यांना लसीचे बूस्टर डोस मिळाले आहेत त्यांच्यासाठी हे संरक्षण आणखी मजबूत आहे.  असे असूनही, तज्ञांनी म्हटले आहे की कोविड -19 संसर्गास सामान्य आजार मानणे चूक होईल.हे कोविड-19 चे रूपे किती वेगाने दिसून येतात यावर अवलंबून आहे. या क्षणी कोणताही अंदाज बांधणे शक्य नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्र सरकारने यावर्षी साडेसहा लाख घरांना मंजुरी दिली, मुख्यमंत्र्यांनी आभार मानले

LIVE: राजकीय कारणासाठी, द्वेष निर्माण करण्यासाठी परभणीला राहुल यांची भेट -देवेंद्र फडणवीस

राजकीय कारणासाठी, द्वेष निर्माण करण्यासाठी परभणीला राहुल यांची भेट -देवेंद्र फडणवीस

विनोद कांबळी यांची प्रकृती ढासळली, रुग्णालयात दाखल

नितीन गडकरींचा नागपूर विमानतळाबाबत अधिकाऱ्यांना अल्टिमेटम

पुढील लेख