Marathi Biodata Maker

कोणतेही कार्ड नसलेल्याना मोफत पाच किलो तांदूळ

Webdunia
गुरूवार, 21 मे 2020 (09:26 IST)
कोणत्याही प्रकारचं रेशन कार्ड नसलेल्यांना राज्यात मोफत पाच किलो तांदूळ  वाटण्यात येणार आहेत. अन्नधान्य पुरवठ्यासाठी कोणी अर्ज केला आहे, कोणाचा अर्ज प्रलंबित आहे किंवा असे केसरी कार्डधारक ज्यांना तांदूळही मिळत नव्हते अशा सर्वांची तहसीलदार पातळीवर यादी तयार करण्यात येणार आहे, अशी घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली. 
 
केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाणे आता ही सुविधा राज्यातही उपलब्ध झाली असून नागरिकांनी याबाबत प्रशासनाची संपर्क केल्यास ते मिळू शकणार असून, आता सर्व पीडित लोकांना लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात ही सुविधा उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
 
ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांनाही काहीतरी अन्नधान्य पुरवठा द्या अशी जी विनंती भारत सरकारला आपण केली होती, त्या धर्तीवर आता जिल्हाधिकाऱ्यांकडे अशा लोकांना देण्याचे आदेश आले आहेत, असं भुजबळ म्हणाले. ट्विट करतही त्यांनी याबाबतची माहिती दिली. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

रायगड जिल्ह्यातील पेण परिसराला 'तिसरी मुंबई' बनवण्याची तयारी सुरू

सुनेत्रा पवार यांनी कोअर कमिटीची बैठक बोलावली

LIVE: श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराला 'अ' श्रेणीच्या पर्यटन स्थळाचा दर्जा

पालघरमध्ये भीषण रस्ते अपघात ट्रकची कंटेनरला धडक १२ जणांचा मृत्यू

भोपाळमधील हाय-प्रोफाईल ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात नवीन वळण, सासूचा ट्विशावर अमली पदार्थांच्या व्यसनाचा आरोप, व्हॉट्सॲप चॅट्स समोर आले

पुढील लेख
Show comments