rashifal-2026

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर

Webdunia
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020 (12:12 IST)
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचा कहर (coronavirus) काही केल्या थांबत नाही. दिवसभरात आतापर्यंतची सर्वाधिक 29 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतल्याची नोंद करण्यात आली. त्यामुळे मृतांची एकूण संख्या 643 झाली आहे. चोवीस तासांत 771 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या 21 हजार 639 झाली आहे. मृतांत शहरातील 13 जणांचा समावेश आहे. दिलासादायक बाब म्हणजे, जिल्ह्यातील 373 जण कोरोनामुक्त झाले असून, आतापर्यंत जिल्ह्यातील 12 हजार 277 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
 
दिवसभरात kolhapur जिल्ह्यात 1 हजार 848 जणांची कोरोनाची प्राथिमक तपासणी झाली. त्यापैकी 1 हजार 703 आरटी-पीसीआरसाठी, तर 540 जणांचे स्वॅब अँटिजेन तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले असून, वाढत्या रुग्णसंख्येमुळे वैद्यकीय क्षेत्र हडबडले आहे. 
 
कोरोनाबाधित रुग्णसंख्या (coronavirus) वाढू लागल्याने गंभीर रुग्णांना रुग्णालयात वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली ठेवून घेतले जात आहे. तर ज्या रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे; मात्र त्यांना कोरोनाची लक्षणे नाहीत अशांना घरीच उपचार दिले जात आहेत. त्यांच्यावरदेखील दक्षता समिती आणि वैद्यकीय पथके लक्ष ठेवून आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

नितीन गडकरी यांनी प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त केली, म्हणाले-तीन दिवसही दिल्लीत राहू शकत नाहीत

Bank Holidays देशातील या राज्यांमध्ये बँका पाच दिवस बंद राहणार

देशांतर्गत महिला क्रिकेटपटूंचे पगार अडीच पट वाढले, बीसीसीआयचा मोठा निर्णय!

Flashback 2025: शेली फ्रेझरपासून बोपण्णा आणि जॉन सीनापर्यंत, या दिग्गजांनी व्यावसायिक कारकिर्दीला निरोप दिला

पाकिस्तानात पुन्हा सुरक्षा दलांना लक्ष्य केले, हल्ल्यात पाच पोलिस ठार

पुढील लेख
Show comments