Festival Posters

आरोग्य सेतू मोबाइल अ‍ॅपचा नवा विक्रम

Webdunia
गुरूवार, 16 एप्रिल 2020 (15:09 IST)
कोरोना विषाणूला हरवण्यासाठी देशातील जनतेने आरोग्य सेतू मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करावे, तसेच इतरांनाही डाउनलोड करण्यास सांगावे असे आवाहन केल्यानंतर या अ‍ॅपने एक नवीन विक्रम केला आहे. अवघ्या 13 दिवसात तब्बल 5 कोटी लोकांनी हा अ‍ॅप डाउनलोड केले आहे.

भारत सरकारने कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या व्यक्तींना ट्रॅक करण्यासाठी  आरोग्य सेतू अ‍ॅप काही दिवसांपूर्वीच लाँच केले होते. या अ‍ॅपचा आता जगात सर्वाधिक डाउनलोड होणार्‍या अ‍ॅपमध्ये समावेश झाला आहे, अशी माहिती नीती आयोगाने आपल्या अहवालातून दिली आहे.

मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना हे अ‍ॅप डाउनलोड करा असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनानंतर अवघ्या 24 तासात 11 मिलियन लोकांनी हे अ‍ॅप डाउनलोड केले आहे. आरोग्य सेतू मोबाइल अ‍ॅपने पोकेमॉन गो गेमिंग अ‍ॅपचा रेकॉर्ड मोडला आहे. 2016 साली पोकेमॉन गो गेमिंग अ‍ॅपला 19 दिवसांत 5 कोटी लोकांनी डाउनलोड केले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

FIFA World Cup: अडीच वर्षांनंतर नेमारचे ब्राझील संघात पुनरागमन

काँगोमध्ये १३१ मृत्यू, ५०० हून अधिक संशयित रुग्ण; आंतरराष्ट्रीय आणीबाणी जाहीर

CBSE ने इयत्ता १२वीच्या परीक्षेच्या स्कॅन केलेल्या प्रती मिळवण्याची तारीख २३ मे पर्यंत वाढवली

ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी व्लादिमीर पुतिन १२-१३ सप्टेंबर रोजी भारताला भेट देतील

LIVE: लाडकी बहिण' योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई सुरू

पुढील लेख