महाराष्ट्राची राजधानी मुंबईत गुरुवारी कोरोनाच्या १ हजार ४९८ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ५६ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला. त्यामुळे मुंबईतील बाधितांचा एकूण आकडा ९७ हजार ७५१ इतका झाला असून मृतांची संख्या ५ हजार ५२०वर गेली आहे. कोरोना विषाणूशी संबंधित प्रत्येक माहिती ...
09:40 PM, 17th Jul
राज्यात कोरोनाच्या १ लाख २० हजार ४८० रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे
राज्यात आज २२१७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.८१ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ६० हजार ३५७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ८३०८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख २० हजार ४८० रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
07:50 PM, 17th Jul
गणेशोत्सवात कोरोनाचे विघ्न टाळण्यासाठी कोकणातील गावोगावच्या दक्षता समित्या, गणेश मंडळांनी अधिक सतर्क राहावे
कोकणातल्या गावोगावच्या दक्षता समित्या, गणेश मंडळे यांच्याकडून आपापल्या गावातला गणेशोत्सव सुरक्षितरित्या आणि आरोग्याचे कुठलेही विघ्न येऊ न देता पार पडण्यासाठी प्रशासनाला मोठे सहकार्य अपेक्षित आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. ते आज रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याकडून कोरोनाच्या उपाययोजनांचा आढावा घेत होते.
04:14 PM, 17th Jul
कोरोना उपचारासाठी मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही तातडीने अधिकची व्यवस्था उभी करा
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे, कोरोनाच्या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे. नवीन रुग्णांची भर पडणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे, तसेच संस्थात्मक क्वारंटाईन ठिकाणी आवश्यक सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात, असेही श्री पवार यांनी सांगितले.
03:36 PM, 17th Jul
कोरोना हे शासनाचं नाटक असल्याचा अजब दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला
मागच्या वर्षीच्या मृत्यू दरापेक्षा यावर्षीचा मृत्यू दर खूप कमी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच कोरोनाच्या नावाने सरकार आपलंच राज्य चालवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला आहे. आज प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपालांची भेट घेतली. यानंतर ते बोलत होते.
Truly honoured by your kind words Sir! My police brothers & sisters are our real heroes & this is the least that I can do for the commendable work which they have been doing. Jai Hind
उपराजधानी नागपूरमध्ये क्वारंटाईन सेंटरमध्ये देखरेख करण्याची जबाबदारी उपजिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली होती. त्यांनाच आता कोरोनाची लागण झाली आहे. काल संध्याकाळी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. उपजिल्हाधिकाऱ्यांच कार्यालय यामुळे सील करण्यात आलं आहे. त्यांच्या संपर्कात आलेले इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
12:15 PM, 17th Jul
सोलापुरात आजपासून दहा दिवस कडकडीत बंद
सोलापूर शहरात आजपासून पुढील दहा दिवसांसाठी कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहराभोवतालच्या तीस गावातही कडक संचारबंदी आहे. या संचारबंदीत रुग्णालये, औषध दुकाने आणि दूध वगळता इतर सर्व आस्थापना बंद राहणार आहेत. आजपासून 26 जुलैपर्यंत ही संचारबंदी लागू करण्यात आली असून या दहा दिवसांच्या कालावधीत नगरपालिका जिल्ह्यातील तब्बल 25 हजार नागरिकांचे अँटिजन टेस्ट करणार आहे.