Marathi Biodata Maker

बुस्टर डोस नाही, मग वेतन पण नाही

Webdunia
गुरूवार, 21 जुलै 2022 (21:17 IST)
कोरोना लसीचा बुस्टर डोस  न घेणाऱ्यांमध्ये कोविड काळात आघाडीवर असणाऱ्या फ्रंट लाईन वर्करचा मोठा समावेश असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता प्रशासनानेही कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. संभाजीनगर जिल्ह्यात ज्या फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांनी बुस्टर डोस न घेतलेल्या वेतन न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता बुस्टर डोस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार नाही असा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. अनेक फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या बुस्टर डोसकडे दुर्लक्ष केल आहे आणि त्यामुळे आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे. एकीकडे कोरोना रुग्ण वाढत असताना लसीकरणाकडे पाठ फिरवणे योग्य नाही अशी चर्चा जिल्हाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत झाली.
 
त्यामुळे कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी एकप्रकारे दणकाच दिला आहे आहे. संभाजीनगर जिल्ह्यात 49 हजार फ्रंट लाईन वर्कर्स आहेत. त्यांनी अजूनही बूस्टर डोस घेतला नाही. संभाजीनगरमध्ये लसींचा पहिला डोस घेणाऱ्यांची टक्केवारी 86 टक्के आहे तर दुसरा डोस घेणाऱ्या लोकांची टक्केवारी अवघी 65 टक्के आहे. त्यामुळे अद्याप अनेकांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला नसल्याचे समोर आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

Ahilyabai Holkar Jayanti 2026 Wishes In Marathi पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

रेल्वे स्टेशनवर वडा पाव आणि डोसा सध्या तरी महाग होणार नाहीत; रेल्वेने दरवाढ पुढे ढकलली; प्रवाशांना मोठा दिलासा

LIVE: ज्येष्ठ नेते शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

‘द हायवे मॅन ऑफ इंडिया’ नितीन गडकरी; ज्यांची विरोधी पक्षही करतात प्रशंसा

इबोलाची लक्षणे असलेल्या युगांडातील महिलेची चाचणी निगेटिव्ह, सतर्क राहा असे सरकारचे आवाहन

पुढील लेख
Show comments