Festival Posters

श्रीलंकेनंतर युएईने दिली ऑफर

Webdunia
सोमवार, 11 मे 2020 (10:44 IST)
मे महिन्याचा दुसरा आठवडा सुरू आहे. कोरोना व्हायरस नसता तर आयपीएलचा 13वा हंगाम आता पिकवर असता. कारण नियोजित वेळेनुसार आयपीएल 29 मार्चपासून सुरू होणार होती आणि 24 मे रोजी फायनल सामना होणार होता. असे झाले असते तर आता क्वालीफायर मॅच खेळण्यासाठी कोणत्या संघाला किती सामने जिंकावे लागतील आदी चर्चा सुरू असत. पण करोनाने सर्व काही बिघड बीसीसीआयने ही स्पर्धा प्रथम 14 एप्रिलपर्यंत स्थगित केली होती. पण त्यानंतर कोरोना संकट वाढल्यामुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहे.

जोपर्यंत सरकारकडून परवानगी मिळत नाही तोपर्यंत स्पर्धा होणार नाही, असे बीसीसीआयच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. भविष्यात ही स्पर्धा होईल की नाही याबद्दल कोणी सांगण्यास तयार नाही. दरम्यान, आयपीएलचे आयोजन करण्याची तयारी काही दिवसांपूर्वी श्रीलंकेने दाखवली होती. लंकने बीसीसीआयला तशी ऑफर दिली होती. अर्थात बीसीसीआयने या ऑफरमध्ये फारसा रस दाखवला नाही. आता लंकेनंतर आणखी एका देशाने आयपीएलचे आयोजन करण्याची तयारी दाखवली आहे.

युएईने बीसीसीआयला घेण्याची ऑफर दिली आहे. करोना संकटामुळे यावर्षी स्पर्धा परदेशात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धूमल यांनी देखील ही बाब मान्य केली आहे. अर्थात बीसीसीआयने श्रीलंका असो की युएई या दोन्ही देशांच्या ऑफरवर कोणताही विचार केला नाही. कारण कोणत्याही मोठ्या देशात अद्याप क्रिकेटला सुरुवात झालेली नाही. अद्याप आंतरराष्ट्रीय विमान सेवाच सुरू झालेली नाही. त्यामुळे असा निर्णय घेण्याचा प्रश्नच येत नसल्याचे अरुण धूमल यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

ड्रोन हल्ल्यांनंतर पुतिन यांचा मोठा निर्णय, महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेसाठी राखीव सैन्य मागे घेतले जाणार

LIVE: नामांकनाच्या शेवटच्या दिवशी भाजप शिवसेनेतील युती14 ठिकाणी तुटली

बुलढाण्यात चारित्र्यावर संशय घेत पती ने केली पत्नी व मुलाची हत्या

नववर्षाच्या दिवशी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगावरील व्हीआयपी दर्शन बंद

नामांकनाच्या शेवटच्या दिवशी भाजप शिवसेनेतील युती14 ठिकाणी तुटली

पुढील लेख
Show comments