Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुणे : हॉटस्पॉट्समधील सुमारे ५१.५ टक्के नागरिकांमध्ये अँटिबॉडीज

Webdunia
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020 (08:40 IST)
पुण्याच्या हॉटस्पॉट्समधील सुमारे ५१.५ टक्के नागरिकांना कोरोना होऊन गेल्याचं स्पष्ट झालय. पुण्यातील आयसर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलेल्या सेरॉलॉगिकल सर्व्हेक्षणातून ही बाब समोर आलीय.
 
पुण्यामध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून आलेल्या भागांत हा सर्व्हे करण्यात आला होता. त्यात एकूण १६६४ रक्त चाचण्या घेण्यात आल्या. त्यापैकी ५१.५ टक्के लोकांच्या शरीरात अँटिबॉडीज आढळल्या.
 
येरवडामध्ये ३६७ जणांच्या रक्ताची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ५६.६ टक्के जणांमध्ये अँटिबॉडीज आढळल्या. कसबा येथील सोमवार पेठ ३५२ पैकी ३६.१ टक्के, रास्ता पेठ येथील रविवार पेठमध्ये ३३५ पैकी ४५.७ टक्के, लोहियानागर येथील कासेवाडीमध्ये ३१२ पैकी ६५.७ टक्के, नवी पेठ येथील पर्वतीत २९८ पैकी ५६.७ टक्के जणांमध्ये अँटिबॉडीज आढळल्या. एकूण १६६४ सॅम्पलपैकी ५१.५ टक्के बाधित कोरोना होऊन गेल्याचे समोर आलंय.
 
पुणे विभागीय आयुक्त सौरव राव, आयसर चे संचालक प्रो. शशिधर यांनी ही माहिती दिली. महत्वाचं म्हणजे अँटिबॉडीज आढळलेल्या नागरिकांमध्ये कोरोनविरोधातील प्रतिकारशक्ती विकसित झालेली असते. मात्र अशा लोकांना पुन्हा कोरोना होणार नाही असं अजिबात नाही हेदेखील तज्ज्ञांनी स्पष्ट केलय.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

एमआयडीसी फॉइल कारखान्यातील स्फोटात मृत्युमुखी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने भरपाई आणि नोकरी जाहीर केली

मुंबईत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची 14 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

LIVE: जळगाव जिल्ह्यातील 5 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार

यवतमाळ जिल्ह्यात एका झाडाने शेतकऱ्याला करोडपती केले

एलएसजीने गुजरात टायटन्सचा 6 गडीने पराभव केला,टॉप-4 मध्ये स्थान मिळवले

पुढील लेख
Show comments