Festival Posters

दिलासादायक, कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला

Webdunia
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020 (08:31 IST)
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण सातत्यानं वाढताना दिसत होते. पण रुग्णवाढीचा वेग मंदावल्याचं दिलासादायक चित्र  समोर आलं आहे. सोमवारी राज्यात 5,984 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, 15 हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 13,84,879 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.48 % एवढे झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 
 
राज्यात सोमवारी 125 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.  सध्या राज्यातील मृत्यूदर 2.64 % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 81,85,778 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 16,01,365 (19.56 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 24,14,577 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 23,285 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात एकूण 1,73,759 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात 5,984 नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 16,01,365 झाली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

Suzie Bates Retirement: न्यूझीलंडच्या दिग्गज अष्टपैलू खेळाडू सुझी बेट्सने निवृत्ती जाहीर केली

अमेरिकेत पुढील तीन वर्षांसाठी एच-१बी व्हिसा मिळणार नाहीत! ट्रम्प प्रशासनाने काँग्रेसमध्ये विधेयक सादर केले

LIVE: शिक्षणविषयक निर्णयावरून गदारोळ, नागपूरमधील ६२० शाळांवर संकटाचे सावट

Maharashtra Din 2026 महाराष्ट्र दिन २०२६ इतिहास, महत्त्व, उत्सव आणि सोहळे

शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्ह (धनुष्यबाण) वादावर २९ एप्रिल, २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार

पुढील लेख
Show comments