Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिक्षकांची कोरोना चाचणी मोफत करण्यात येणार

शिक्षकांची कोरोना चाचणी मोफत करण्यात येणार
, बुधवार, 18 नोव्हेंबर 2020 (13:34 IST)
राज्यातील शाळांमध्ये नववी ते बारावीचे वर्ग सोमवारपासून सुरू होणार असून, त्यासाठी शिक्षकांची कोरोना चाचणी मोफत करण्यात येणार आहे. शाळा र्निजतुक करणे, तापमान मापक उपलब्ध करून देणे अशा जबाबदाऱ्याही शिक्षण विभागाने स्थानिक प्रशासनावर सोपवल्या आहेत.
 
राज्यातील शाळांमध्ये नववी ते बारावीचे वर्ग सुरू होत आहेत. त्यासाठी शाळा र्निजतूक करणे, आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून देणे अशी सर्व व्यवस्था स्थानिक प्रशासनाने करावी, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. शिक्षकांना करोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले असून, कोरोना प्रादुर्भाव झाला नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच शिक्षकांना शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. शिक्षकांची कोरोना चाचणी शासकीय केंद्रात मोफत करण्यात यावी, असे शिक्षण विभागाने स्थानिक प्रशासनाला सांगितले आहे. ही चाचणी २२ नोव्हेंबपर्यंत करायची आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

26 नोव्हेंबर रोजी नोकिया 2.4 बजेट स्मार्टफोन भारतात लॉन्च होणार; टीझर रिलीज; बॅटरी आणि कॅमेरा मजबूत असेल