Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यातील दैनंदिन नव्या रुग्णसंख्येतही घट

Webdunia
बुधवार, 3 नोव्हेंबर 2021 (09:24 IST)
पुणे शहर आणि जिल्ह्यातील करोना रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे, तसेच राज्यातील दैनंदिन नव्या रुग्णसंख्येतही घट झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून सक्रिय म्हणजे, प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय घट दिसून येत आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १०० किंवा त्याहून कमी असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे.
 
मार्च २०२० मध्ये महाराष्ट्रात करोना रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर सातत्याने महाराष्ट्र राज्यातील रुग्णसंख्येने विक्रमी उच्चांक नोंदवले. मागील आठवड्यापासून रुग्णसंख्येत दिलासादायक घट दिसून येत आहे. राज्यात दोन वेळा नीचांकी दैनंदिन नवे रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून प्रत्यक्ष उपचाराधीन असलेल्या रुग्णांच्या संख्येतही मोठी घट दिसत आहे. २० जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १०० पेक्षा कमी असल्याचे दिसून येत आहे.
 
यांमध्ये प्रामुख्याने जळगाव, नंदूरबार, धुळे, जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. भिवंडी, उस्मानाबाद, औरंगाबाद, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्णसंख्या ५०० पेक्षा कमी आहेत. उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये राज्यातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १५,५५२ (एक नोव्हेंबरच्या अहवालाप्रमाणे) एवढी आहे.
 
राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, राज्यात सध्या १५,५५२ सक्रिय रुग्ण आहेत. त्यांपैकी सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबई, ठाणे, पुणे आणि अहमदनगर या चार जिल्ह्यांमध्ये आहेत. मात्र, सक्रिय रुग्णसंख्येत दिसत असलेली घट लक्षणीय आणि सकारात्मक आहे.
 
दैनंदिन नव्या रुग्णांची संख्या घटली असल्याने सक्रिय रुग्णसंख्येत घट दिसत आहे. मात्र, दिवाळी आणि त्यानिमित्ताने होणारे पर्यटन आणि भेटीगाठी या काळात नागरिकांनी करोना प्रतिबंधात्मक खबरदारीपूर्ण वर्तन करणे अपेक्षित आहे. मुखपट्टी, वैयक्तिक स्वच्छता, हात धुणे, शारीरिक अंतर, गर्दी टाळणे या नियमांचा अवलंब केल्यास रुग्णसंख्येतील घट कायम राखणे शक्य असल्याचेही डॉ. आवटे यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

LIVE: संजय राऊत यांनी राहुल गांधींना पाठिंबा दिला

देवेंद्र फडणवीस सभागृहात खोटे बोलले! राहुल गांधींच्या समर्थनार्थ संजय राऊत म्हणाले

Sane Guruji Jayanti 2024: पांडुरंग सदाशिव साने जयंती

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राहुल गांधींच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली

शिवसेनेचे यूबीटी नेते सुभाष देसाई मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली

पुढील लेख
Show comments