rashifal-2026

कोरोनाचा राज्यात एकही संशयित रुग्ण नाही, ७ जण निरीक्षणाखाली - आरोग्यमंत्री

Webdunia
मंगळवार, 3 मार्च 2020 (10:19 IST)
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या सातजण निरीक्षणाखाली आहेत. मात्र आतापर्यंत एकही संशयित रुग्ण आढळून आलेला नाही. सध्या मुंबईत दोन जण, तर पुणे येथे चार आणि नाशिक येथे एक जण भरती आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी रुग्णालयात निरीक्षणाखाली १३७ जणांना ठेवण्यात आले होते त्यापैकी १३२ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत तर १३० जणांना घरी  सोडण्यात आले आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
 
बाधित भागातून आलेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या प्रवाशांनी २ आठवडे घरी थांबावे आणि सामाजिक संपर्क टाळावा, अशा सूचना सर्वांना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर चीन, हाँगकाँग, थायलंड, सिंगापूर, दक्षिण कोरिया,जपान, नेपाळ,इंडोनेशिया, व्हिएतनाम, मलेशिया, इराण आणि इटली या १२ देशातील ५३५ विमानांमधील ६४ हजार ९८ प्रवासी तपासण्यात आले आहेत. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून ३८२ प्रवासी आले आहेत. त्यापैकी ३१८ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रात शासकीय रुग्णालयांत ‘रजोनिवृत्ती उपचार केंद्र’ सुरू

शिंदेंच्या बंडामुळे दिल्लीत खळबळ, बीएमसीमध्ये मोठे वादळ येण्याची चिन्हे!

150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात कामगार विभाग आघाडीवर

आसाममधील ब्रह्मपुत्र नदीत बोट उलटली, चार मुलांसह सहा जण बेपत्ता

LIVE: महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांसाठी पावसाचा पिवळा इशारा जारी

पुढील लेख
Show comments