Festival Posters

पुन्हा नाशिकात लसीकरण बंद

Webdunia
रविवार, 4 जुलै 2021 (11:23 IST)
नाशिक: शहरात उद्या (दि ४) रोजी संपूर्ण लसीकरण बंद राहणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांपासून नाशकात लशींच्या तुटवड्यामुळे लसीकरण बंद पडले होते. काल (दि ०२) रोजी नाशिक जिल्ह्यासह शहराला ५७ हजार लसी प्राप्त झाल्या. यानंतर आज (दि ०३) रोजी सकाळपासून जिल्ह्याच्या विविध भागांसह शहरात लसीकरण पार पडले....
 
शासकीय अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार दोन दिवस पुरेल इतका लसींचा साठा नाशिकला मिळाल्याचे त्यांनी त्यांनी सांगितले होते. त्यामुळे या आठवड्यात रविवारीदेखील लसीकरण सुरु राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, उद्या पूर्णदिवस लसीकरण बंद राहणार आहे.
 
तसेच उद्या सायंकाळी जर लसींचे आणखी डोस नाशिकला प्राप्त झाले तर पुन्हा एकदा सोमवारपासून (दि ५) लसीकरणा नव्या दमाने सुरु करण्यात येणार आहे. सोमवारच्या लसीकरणाबाबतची माहिती उद्या रात्रीपर्यंत मिळणार आहे.
 
तसेच उद्या (दि ०४) रोजी लसीकरण बंद असल्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये असेही आवाहन मनपा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

पश्चिम बंगाल: कोलकातासह राज्यातील सहा न्यायालयांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्यांमुळे परिसरात घबराट

मुंबई : मानसिक रुग्णाने विवाहित बहिणीवर कुऱ्हाडीने वार करून हत्या केली

बृहन्महाराष्ट्र मंडळाचे ७४ वे वार्षिक अधिवेशन देवासमध्ये २७ फेब्रुवारीपासून

LIVE: मुख्यमंत्री फडणवीसांनी डिजिटल अटकेबद्दल जागरूकता वाढवली

हैदराबादला जाणारे ब्रिटिश एअरवेजचे विमान नागपूरला वळवण्यात आले

पुढील लेख
Show comments