Dharma Sangrah

3-4 दिवस लसीकरण बंद राहणार

Webdunia
गुरूवार, 4 नोव्हेंबर 2021 (15:00 IST)
दिवाळीमुळे लसीकरणाला मिळणारा प्रतिसाद हा कमी असतो. या पार्श्वभूमीवर लसीकरणाला तीन दिवस सुट्टी देण्यात आली आहे. दिवाळी पाडव्याच्या दिवशी मात्र अर्धा दिवस लसीकरण सुरू राहणार आहे.
 
दिवाळीनिमित्त महापालिकेला आज गुरुवार (दि. 4) पासून रविवार (दि. 7 नोव्हेंबर) पर्यंत सुट्टी असणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली. सोमवार दिनांक 8 नोव्हेंबर 2021 रोजी लसीकरण पूर्ववत सुरु करण्यात येईल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात येतेय. 
 
शनिवारी व रविवारीही लसीकरण बंद राहणार आहे. दिवाळीनिमित्त अनेक जण परगावी जात असतात. त्यामुळे आणि कामगारांच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर लसीकरण बंद राहणार आहे.
 
मुंबई महानगरपालिकेकडे कोविड लसींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे सोमवारपासून लसीकरण मोहीम पूर्ववत सुरु राहणार आहे. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपूरमध्ये आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांचा साठा जप्त, २ आरोपींना अटक

RCB vs GT: विजयानंतर कोहलीने पडिक्कलचे कौतुक केले

शिक्षणविषयक निर्णयामुळे खळबळ; महाराष्ट्रातील नागपूरमधील ६२० शाळा संकटात, निर्णय रद्द करण्याची मागणी

स्वाती मालीवाल यांनी 'आप'चा राजीनामा दिला, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भाजपमध्ये प्रवेश केला

भाजप हा बकासुरांचा पक्ष बनला आहे, ते काहीही खातात त्याचं पोट काय भरत नाही, संजय राऊतांची जोरदार टीका

पुढील लेख
Show comments