Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या घटनांसाठी कोणते म्यूटेंट वैरिएंट जबाबदार आहे ? केंद्रसरकाराचे मोठे विधान

Webdunia
गुरूवार, 11 मार्च 2021 (22:24 IST)
महाराष्ट्राच्यासह काही राज्यातील कोविड-19 च्या  घटनां मध्ये सतत  वाढ झाल्याबद्दल चिंता व्यक्त करताना केंद्राने गुरुवारी लोकांना सावध आणि सजग राहण्याचा सल्ला दिला आहे. साथीचा रोग अद्याप संपलेला नसल्यामुळे निष्काळजीपणा करू नका असे ही सांगण्यात आले आहे. 
  
नीती आयोगाचे सदस्य( आरोग्य) व्ही के पॉल यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील कोरोना विषाणूची स्थिती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे. त्यांनी 15 ते 21 मार्च दरम्यान नागपुरात लावलेल्या लॉकडाऊन बाबत बोलताना म्हणाले की आपण पुन्हा अशा स्थितीत पोहोचलो आहोत जिथे कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी अशी पाउले उचलावी  लागत आहे.  
पॉल म्हणाले की महाराष्ट्रात कोरोना च्या वाढत्या प्रकरणाबाबत आम्ही काळजीत आहोत. हा विषाणू सहज घेऊ नका. हा अनपेक्षितपणे वर येऊ शकतो. जर आपल्याला या संसर्गापासून मुक्ती पाहिजे तर कोविड-19 च्या संदर्भात, योग्य मार्ग म्हणजे प्रतिबंधक धोरण अवलंबविण्यासह लसीकरणाचा मार्ग अवलंबवावा लागेल. त्यांनी सल्ला दिला की अशा जिल्ह्यात जिथे कोविड-19 च्या घटनांमध्ये वाढ होतं आहे. तिथे पात्र लोकांच्या लसीकरणाचे काम वेगाने वाढवावे लागणार. 
 
पॉल म्हणाले की आज लसीकरणामुळे आपण अशा परिस्थितीत आहोत 
ज्यात साथीच्या रोगापासून चांगला सामना करू शकतो. आपल्याला संकल्प करावे लागेल. निष्काळजी होऊ नका. लसीकरण घ्या.
 
कोरोना व्हायरसचे बदललेले रूप हे प्रकरणांच्या वाढीस जबाबदार आहेत का, असे विचारले असता, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे(आईसीएमआर) महासंचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, महाराष्ट्रातील प्रकरणे वाढण्यामागील हे कारण नाही.
 
ते म्हणाले की या वेळी तपासणी, संक्रमित लोकांचा तपास लावण्यात कमतरता, कोविड -19 साठी योग्य पद्धती न अवलंबविणे आणि मोठ्या प्रमाणात जमावडा करणे हे कारण आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की ,नागपूर पुणे,ठाणे, मुंबई, बेंगलुरू शहरी, एर्नाकुलम, अमरावती, जळगाव, नाशिक आणि औरंगाबाद जिल्हात  सर्वात अधिक कोविड-19 च्या रुग्णांवर उपचार सुरु आहे.
 
ते म्हणाले की आम्हाला असे वाटत आहे की संसर्ग होण्याच्या बाबतीत गुजरात,मध्यप्रदेश आणि हरियाणा हे निर्णयात्मक टप्प्यावर आहेत जिथे अद्याप प्रकरणे वाढलेली नाहीत. परंतु प्रकरणे वाढू नये या साठी बैठक घेऊन राज्यामध्ये निषिद्ध क्षेत्राची तपासणी आणि देखरेख करण्यास सांगितले आहेत.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख