Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऑस्ट्रेलियाची पाचवंदा विश्वविजेतेपदावर मोहोर

Webdunia
सोमवार, 30 मार्च 2015 (07:30 IST)
ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचे पानीपत करत 2015 च्या विश्वचषकावर आपले नाव कोरले. ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा हा विश्वचषक जिंकला. आपल्या अखेरच्या सामन्यात शानदार अर्धशतक झळकवत कर्णधार क्लार्कने ऑस्ट्रेलियाला हा विश्वचषक सहजरीत्या जिंकून दिला.
 
अंतिम सामन्याचे नाणेङ्खेक जिंकत न्यूझीलंडने फलंदाजी घेतली. पण ऑस्ट्रेलियान गोलंदाजांच्या भेदक मार्‍यासमोर न्यूझीलंडच्या संघ मैदानावर ङ्खार काळ टिकू शकला नाही. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा अख्खा संघ 45 षटकात 183 धावांवर गुंडाळला. ऑस्ट्रेलिया विजय तेव्हाच निश्चित झाला होता. पुढे ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी विजयाची औपचारीकता पूर्ण केली. ऑस्ट्रेलियाने 7 गडी राखून 34 व्या षटकात न्यूझीलंडवर सहज विजय मिळवला आणि 2015 चा विश्वचषक खिशात घातला. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जेम्स फॉल्कनर हा अंतिम सामन्याचा सामनावीर ठरला. त्याने तीन गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल स्टार्क हा विश्वचषकमधील सर्वोत्तम खेळाडू ठरला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते सर्वाधिक 22 बळी घेणार्‍या मिचेल स्टार्कला हा मालिकावीराचा पुरस्कार दिला गेला. ऑस्ट्रेलियाचा हा विजय विश्वचषकापूर्वी झालेल्या एका सामन्यात चेंडू लागून मृत्युमुखी पडलेल्या फिलिप ह्युजेला श्रद्धांजलीपूर्वक अर्पण करतो, असे कर्णधार मायकल क्लार्कने विजयानंतर सांगितले.
 
विश्वजेता ऑस्ट्रेलियाचा विश्वचषकामध्ये केवळ एका सामन्यात पराभव झाला, तर एक सामना टाय झाला. घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकणारा भारतानंतर ऑस्ट्रेलिया हा दुसरा संघ ठरला आहे. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी चार विश्वचषक जिंकला होता. 
 
ऑस्ट्रेलियाचा हा पाचवा वर्ल्डकप आहे. ऑस्ट्रेलिया 1987, 1999, 2003, 2007 आणि आता पाचव्यांदा 2015 चा विश्वचषक जिंकत विश्वजेता ठरला.
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

ऑस्ट्रेलियात हरल्यानंतर आता यशस्वी जैस्वाल यांची प्रतिक्रिया समोर आली

दिव्यांग चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर, विक्रांत रवींद्र केनीकडे कर्णधारपद

WTC Final: भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीतून बाहेर

अष्टपैलू ऋषी धवनने घेतली मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्ती

INDW vs IREW: भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी आयर्लंडने संघ जाहीर केला

Show comments