Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला सामना आज, विराटचा संघाबद्दल इशारा

ICC World Cup 2019 INDvSA
Webdunia
साउदॅम्प्टन- आयसीसी वर्ल्ड कप 2019 मध्ये आज भारताचा सामना दोनदा विश्व चँपियन दक्षिण आफ्रिकाविरुद्ध होणार आहे. भारतीय वेळेनुसार तीन वाजता सामना सुरु होणार. 
 
भारतीय संघाची तयारी जोरदार असली तरी पहिल्या सामन्याची कामगिरीकडे सर्वांचे लक्ष आहे. क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. पण आजचे अकरा शिलेदार कोण यावर सर्वांची नजर टिकून आहे. खेळपट्टीचा अंदाज बांधता आफ्रिकेविरुद्ध भारत एक अतिरिक्त जलदगती गोलंदाजासह मैदानात उतरेल, असे संकेत कोहलीनं दिले. 
 
पराजयाचा सामना करत असलेला दक्षिण आफ्रीका जखमी वाघाप्रमाणे भारताला सामोरा जाणार आहे. आयपीएलमध्ये खांद्याच्या दुखापतीमुळे 35 वर्षीय वेगवान गोलंदाज डेल स्टेन फिटनेस समस्यामुळे वर्ल्डकपमधून बाहेर आहे. स्टनेऐवजी ब्यूरोन हेंडरिक्सला संघात सामील करण्यात आले आहे. 
 
विराट  गोलंदाजांच्या दृष्टीनं विचार करत दोन फिरकीटू व दोन जलदगती गोलंदाजांसह मैदानावर उतरल्यास सुरुवातीला परिस्थिती वेगळी आणि नंतर वेगळी असेल असा अंदाज बांधत आहे. अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी गोलंदाजांनी तयारी करायला हवी. 
 
ऑलराउंडर केदार जाधव फिट घोषित केले गेले आहे त्यामुळे त्याचे संघात असणे फायद्याचे ठरेल. या खेळपट्टीवर घास नसल्याने फलंदाजांसाठी आपलं कमाल दाखवण्याची संधी आहे. भारतीय संघाकडे अनेक मॅच विनर आहे त्यामुळे आत्मविश्वास भरपूर आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

आयसीसी स्पर्धेतही भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार नाही!

CSK vs SRH: आज 43 वा लीग सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात प्लेऑफ मध्ये पोहोचण्यासाठी सामना होणार, प्लेइंग 11 जाणून घ्या

आरसीबीने केली मोठी कामगिरी,10 वर्षांचा जुना विक्रम मोडला

RCB vs RR : राजस्थानचा आरसीबीने 11 धावांनी पराभव केला

RCB vs RR: आयपीएलच्या ४२ व्या सामन्यात आरसीबी आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने येणार

पुढील लेख
Show comments