Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ENG vs NED : अखेर इंग्लंड विजयी; पुण्यात बेन स्टोक्सचं शतक

Webdunia
बुधवार, 8 नोव्हेंबर 2023 (23:46 IST)
गतविजेत्या इंग्लंडची यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील पराभवाची मालिका अखेर 8 नोव्हेंबरला पुण्यात तुटली.गहुंजे इथे एमसीए स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडनं नेदरलँड्सचा 160 धावांनी पराभव केला.
इंग्लंडनं दिलेल्या 340 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँड्सचा संपूर्ण संघ 37.2 ओव्हर्समध्ये 179 धावांवर बाद झाला.
 
इंग्लंडचा या स्पर्धेतील हा दुसराच विजय आहे. तब्बल पाच सामने सलग पराभूत झाल्यानंतर त्यांनी हा विजय मिळवला आहे. याआधी 10 ऑक्टोबरला त्यांनी बांगलादेशला हरवलं होतं.
 
नेदरलँड्सवरील विजयामुळे इंग्लिश टीमच्या नेट रनरेटमध्येही वाढ झाली असून पाकिस्तानमध्ये 2025 साली होणाऱ्या चॅम्पियम्स ट्रॉफी स्पर्धेत प्रवेश मिळवण्याच्या इंग्लंडच्या आशा कायम आहेत. विश्वचषकाच्या गुणतालिकेत पहिल्या आठ क्रमांकाचे संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरतील.
 
इंग्लंडचा शेवटचा सामना 11 नोव्हेंबरला पाकिस्तानविरुद्ध होणार असून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरायचं तर त्यांना पाकिस्तानविरुद्धही जिंकावं लागेल.
 
दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांना हरवणाऱ्या डच आर्मीनं या सामन्यात निराशा केली. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये इंग्लंडनं नेदरलँड्सवर वर्चस्व गाजवलं.
 
नेदरलँड्सकडून तेजा निदामानुरूनं सर्वाधिक नाबाद 41 धावा केल्या. तर, कर्णधार स्कॉट एडवर्ड्सनं 38 धावा केल्या. या दोघांनी सहाव्या विकेट्ससाठी 59 धावांची भागिदारी केली.
 
इंग्लंडकडून आदिल रशीद आणि मोईन अली यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. डेव्हिड वायलीला 2 तर ख्रिस वोक्सला 1 विकेट मिळाली.
 
त्यापूर्वी बेन स्टोक्सच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडनं 50 षटकांत 9 बाद 339 रन्सची मजल मारली होती.
 
स्टोक्सचं शतक
बेन स्टोक्सनं खरंतर वन डेतून निवृत्ती घेतली होती पण विश्वचषकासाठी त्यानं निवृत्तीचा निर्णय मागे घेतला होता. मात्र फिट नसल्यानं तो सुरूवातीचे काही सामने खेळू शकला नाही.
 
श्रीलंकेविरुद्ध 43 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 64 धावा करणाऱ्या स्टोक्सला मोठी खेळी करण्यात अपयश येत होतं. त्यानं नेदरलँड्सविरुद्ध ही कसर भरून काढली.
 
सुरूवातीला संघाची गरज म्हणून संथ खेळणाऱ्या स्टोक्सनं पाहता-पाहता गियर बदलला आणि शेवटच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजी करत शतक झळकावलं.
 
बेन 84 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 6 षटकारांसह 108 धावा केल्या. त्यानं ख्रिस वोक्ससोबत सातव्या विकेटसाठी 129 धावांची भागिदारी केली. वोक्सनं 51 धावा काढल्या.
 
पण त्याआधी इंग्लंडची 1 बाद 133 वरुन 6 बाद 192 अशी घसरगुंडी उडाली होती.
इंग्लंडचा सलामीवीर दाविद मालननं 87 धावा करत चांगली सुरूवात केली होती. पण, जॉनी बेअरस्टो, ज्यो रूट, जोस बटलर, मोईन अली मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरले.
 
इंग्लंड पूर्ण 50 ओव्हर्स फलंदाजी करणारा का ? असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी स्टोक्स आणि वोक्स यांच्या भागिदारीनं चित्र बदललं.

















































Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

SA20: पहिल्याच सामन्यात 28 वर्षीय खेळाडूचा मलिंगा-बुमराहच्या स्पेशल क्लबमध्ये प्रवेश

विराट-अनुष्का यांनी वृंदावन जाऊन प्रेमानंद महाराजांची भेट घेत आशीर्वाद घेतले

2024 मध्ये संजू सॅमसनने धमाल केली, 2025 मध्येही त्याची जादू अशीच सुरू राहील का?

हार्दिक पांड्याला मोठा झटका! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी बीसीसीआय मोठा निर्णय घेऊ शकते

जसप्रीत बुमराह 'आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ' पुरस्कारासाठी नामांकित

पुढील लेख
Show comments