Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IND vs AUS Score : रोहित, शुबमन, श्रेयस आउट फायनलमध्ये पुन्हा एकदा विराटवर जबाबदारी

Webdunia
रविवार, 19 नोव्हेंबर 2023 (15:46 IST)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी वन-डे विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना होतोय.
पंधरा ओव्हरच्या आतमध्येच रोहित शर्मा, शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर तंबूत परतल्यानंतर आता पुन्हा एकदा विराट कोहलीवर भारताचा डाव सांभाळण्याची जबाबदारी आहे.
 
10.2 - ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं श्रेयस अय्यरला 4 धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिलाय. भारताची 11 व्या ओव्हरमध्ये 3 बाद 81 अशी अवस्था झाली आहे.
 
9.4 -रोहितने संपूर्ण स्पर्धेतला त्याचा आक्रमक अंदाज कायम ठेवत ग्लेन मॅक्सवेलला षटकार आणि चौकार खेचून त्याच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला पण चौथ्या बॉलवर ट्रेव्हिस हेडने मागे पळत जाऊन आक्रमक कॅच घेत रोहित शर्माला तंबूचा रस्ता दाखवला.
 
फटकेबाजीच्या नादात रोहित, अय्यर स्वस्तात परतले
भारताकडून सलग दोन शतकं झळकावलेल्या श्रेयस अय्यरला फायनलमध्ये फार कमाल करता आली नाही. चौथ्याच चेंडूवर पॅट कमिन्सने उजव्या स्टम्पवर टाकलेल्या बॉलला खेळण्याच्या नादात श्रेयस आउट झाला.
 
आउट होण्यापूर्वी रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम केला. यापूर्वी हा विक्रम वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर होता.
 
गेलनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 85 षटकार लगावले होते. रोहितनं वर्ल्ड कप फायनलमध्ये गेलला मागं टाकलंय.
 
शुबमन गिल स्वस्तात आउट
4.1 - पाचव्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर मिचेल स्टार्कचा बॉल फटकावण्याच्या नादात शुबमन गिल आउट झाला. शुबमन गिल आउट झाल्यानंतर विराट कोहली फलंदाजीला उतरला.
 
त्याआधी साखळी सामन्यांमध्ये आक्रमक सुरुवात करून देण्याचा ट्रेंड बदलत भारतीय सलामीवीरांनी फायनलमध्ये सावध सुरुवात केली.
 
तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला.
 
यजमान भारतानं या स्पर्धेत सलग 10 सामने जिंकलेत. तर, ऑस्ट्रेलियानं सलग 8 सामने जिंकून अंतिम फेरी गाठलीय. दोन्ही संघात यापूर्वी झालेल्या सामन्यात भारतानं 6 विकेट्सनं विजय मिळवला होता.
 
दोन्ही संघांनी सेमी फायनलमधील विजयी संघात कोणताही बदल केलेला नाही.
 
वर्ल्डकप फायनलमध्ये घुसला पॅलेस्टाईनचा समर्थक
भारताचा डाव सुरु असताना 'फ्री पॅलेस्टाईन' असा मजकूर लिहिलेला टी-शर्ट घालून एक व्यक्ती मैदानात घुसला.
 
वर्ल्ड कप फायनलला केलेल्या सुरक्षाव्यवस्थेची चर्चा माध्यमांमध्ये केली जात असताना अशा पद्धतीने एक व्यक्ती मैदानात घुसल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
 
पॅलेस्टाईनचा झेंडा हातात घेतलेल्या या व्यक्तीने मैदानावर येऊन विराट कोहलीला आलिंगन देण्याचा प्रयत्न केला. मैदानावर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं.
गेल्या 12 वर्षांपासून भारतीय क्रिकेट चाहते ज्या क्षणाची वाट पाहतायत तो आता काही तासांवर आलाय. या निर्णायक क्षणानं मागच्या दहा वर्षात हुलकावणी दिलीय. अखेर ही प्रतीक्षा संपणार का?
 
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 1 लाख 32 हजार प्रेक्षकांच्या गजरात रोहित शर्मा विश्वविजेतेपदाची ट्रॉफी उंचावणार का? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
 
कसा होता दोन्ही टीमचा प्रवास?
भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ तब्बल 20 वर्षांनी वर्ल्ड कप फायनलमध्ये आमने-सामने उभे ठाकलेत.
 
यापूर्वी 2003 साली झालेल्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाचा 125 धावांनी पराभव केला होता.
मागच्या 20 वर्षांमध्ये परिस्थिती बदललीय. यजमान भारतानं सलग दहा सामने जिंकत फायनलमध्ये प्रवेश केलाय. या प्रत्येत सामन्यात भारतीय खेळाडूंनी कामगिरी उंचावत आपली स्पर्धा इतरांशी नाही तर स्वत:च्याच पूर्वीच्या कामगिरीशी आहे हे दाखवून दिलंय.
 
ऑस्ट्रेलियानं पहिले दोन सामने गमावल्यानंतर सलग आठ सामने जिंकलेत. या आठपैकी न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांना विजयासाठी संघर्ष करावा लागलाय.
 
भारताची बाजू वरचढ का?
फायनलपूर्वी झालेल्या दोन्ही सामन्यात भारतीय फलंदाजीची ‘पॉवर’ सर्वांनी पाहिलीय. या दोन्ही सामन्यात प्रत्येकी 2 फलंदाजांनी शतक झळकावलंय.
 
रोहित शर्मा सातत्यानं आक्रमक सुरूवात करुन देतोय. शुबमन गिलचा नरेंद्र मोदी स्टेडियमवरील रेकॉर्ड जबरदस्त आहे. फायनलमधील पहिल्या दहा ओव्हर ही जोडी कशी खेळणार? यावर भारतीय टीमचं भवितव्य निश्चित होणार आहे.
 
टीम इंडियाची मधली फळी देखील फॉर्मात आहे. एकाच विश्वचषक स्पर्धेतील सर्वाधिक धावा आणि वन-डे क्रिकेटमध्ये 50 शतक हे दोन्ही विक्रम विराटनं सेमी फायनलमध्ये नोंदवलेत. त्यानं या स्पर्धेत 10 पैकी 8 वेळा पन्नाशीचा टप्पा ओलांडलाय. तर, 3 वेळा शतक झळकावलंय.
 
श्रेयस अय्यरनं मागच्या 4 सामन्यात दोन सलग शतकांसह 392 धावा केल्यात. तर के.एल. राहुलची या स्पर्धेतील सरासरी 75 पेक्षा जास्त आहे.
2003 च्या फायनलमध्ये भारताला हरवणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीममध्ये ग्लेन मॅग्रा आणि ब्रेट ली होते. यंदा भारताकडं जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी आहेत. मोहम्मद सिराजही त्यांना तोलामोलाची साथ देतोय.
 
फिरकी गोलंदाजीपुढं गोंधळण्याचा ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा इतिहास आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी कुलदीप यादव आणि रविंद्र जाडेजा सज्ज आहेत.
 
ऑस्ट्रेलिया आव्हानात्मक का?
भारतीय संघ सर्वोत्तम फॉर्मात असली तर विश्वचषकाची फायनल खेळणाऱ्या कोणत्याही टीमला हलक्यात घेता येणार नाही. त्यातच ऑस्ट्रेलियाशी सामना असल्यानं हे आव्हान आणखी खडतर आहे.
 
1996 पासून कोणत्याही विश्वचषक स्पर्धेत निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवल्याशिवाय अन्य टीमला जगज्जेता होता आलेलं नाही.
ऑस्ट्रेलियानं पाचवेळा म्हणजे 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 साली वन डे वर्ल्ड कप जिंकलाय. त्याशिवाय दोनदा म्हणजे 1975 आणि 1996 साली ते उपविजेते ठरले.
 
डेव्हिड वॉर्नर, ट्रेव्हिस हेड आणि मिच मार्श ही त्यांची टॉप ऑर्डर फॉर्मात आहे. स्मिथ आणि लबुशेनसाठी हा विश्वचषक तितका यशस्वी ठरला नसला तरी फायनलमध्ये सर्वोत्तम खेळ करण्याची क्षमता त्यांच्याकडं आहे.
 
विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील दोन्ही संघ असे आहेत :
 
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
 
ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, ट्रेव्हिस हेड, मिच मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जॉश इंग्लिस (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), अ‍ॅडम झम्पा, जॉश हेझलवूड
 




Published By- Priya Dixit
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

IPL 2025: श्रेयस अय्यर लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला

IND vs AUS: 16 कसोटी डावांनंतर विराटचे शतक, सचिनचा विक्रम मोडला

यशस्वी जैस्वालने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात खेळताना विक्रमांची मालिका केली

IND vs AUS: यशस्वी-राहुल यांनी विक्रमांची मालिका केली

IND vs AUS:बुमराहने 11व्यांदा डावात पाच विकेट घेत कर्णधार म्हणून विक्रम केला

पुढील लेख
Show comments