rashifal-2026

दत्तात्रय गुरु तुम्हीच ना!

Webdunia
बुधवार, 16 एप्रिल 2025 (17:48 IST)
जगद्वंद्य अवधूत दिगंबर, दत्तात्रेय गुरु तुम्हीच ना ?
अनन्यभावे शरणांगत मी,भवभय वारण तुम्हीच ना ? ।।
कार्तवीर्य यदु परशुरामही, प्रबोधिले गुरु तुम्हीच ना ?
स्वामी जनार्दन एकनाथ तरी, कृतार्थ केले तुम्हीच ना ?
नवनारायण सनाथ करुनी,पंथ निर्मिला तुम्हीच ना ?
मच्छिंन्द्रादि जति प्रवृत्त केले, जन उद्धारा तुम्हीच ना ?
दासोपंता घरी रंगले, परमानंदे तुम्हीच ना ?
नाथ सदनीचे चोपदार तरी, श्री गुरूदत्ता तुम्हीच ना ?
युगायुगी निजभक्त रक्षणा, अवतरता गुरु तुम्हीच ना ?
बालोन्मत्त पिशाच्चवृत्ती, धारण करता तुम्हीच ना ? 
स्नान काशीपुरी चंदन पंढरी, संध्या सागरी तुम्हीच ना ?
करुनी भिक्षा करविरी भोजन, पांचाळेश्वरी तुम्हीच ना ?
तुळजापुरी करशुद्धी तांबुल, निद्रा माहुरी तुम्हीच ना ?
करुनी समाधी मग्न निरंतर, गिरनारी गुरु तुम्हीच ना ?
विप्र स्त्रियेच्या वचनी गुंतले, पीठापुरी गुरु तुम्हीच ना ?
श्रीपादवल्लभ नृसिंह सरस्वती, करंजनगरी तुम्हीच ना ?
जन्मताच ओंकार जपुनी, मौन धरियेले तुम्हीच ना ?
मौजी बंधनी वेद वदोनी, जननी सुखविली तुम्हीच ना ?
चतुर्थाश्रमा जीर्णोद्धारा, आश्रम घेऊनी तुम्हीच ना ?
कृष्ण सरस्वती सद्गुरू वंदुनी, तीर्था गमले तुम्हीच ना ?
माधवारण्य कृतार्थ केला, आश्रम देऊनी तुम्हीच ना ?
पोटशुळाची व्यथा हरोनी, विप्र सुखविला तुम्हीच ना ?
वेल उपटुनी विप्रा दिधला, हेमकुंभ गुरु तुम्हीच ना ?
तस्कर वधूनि विप्र रक्षिला, भक्तवत्सला तुम्हीच ना ?
विप्रस्त्रियेचा पुत्र उठविला, निष्ठा देखुनी तुम्हीच ना ?
हीनजिव्हा वेदपाठी केला, सजीव करुनी तुम्हीच ना ? 
वाडी नरसिंह औदुंबरही, वास्तव्य करुनी तुम्हीच ना ?
भीमा-अमरजा संगमी आले, गाणगापुरी गुरु तुम्हीच ना ?
राममुहूर्ती संगमस्थानी, अनुष्ठानी रत तुम्हीच ना ?
भिक्षा ग्रामी करुनी राहतां, माध्याह्नी मठीं तुम्हीच ना ?
ब्रह्मराक्षसा मोक्ष देऊनी, उद्धरिले मठीं तुम्हीच ना ?
वांझ महिषी दुभविली, फुलविले शुष्क काष्ठ गुरु तुम्हीच ना ?
नंदीनामा कुष्ठी केला, दिव्यदेही गुरु तुम्हीच ना ?
त्रिविक्रमा विश्वरूपा दाऊनी, कुमसी ग्रामी तुम्हीच ना ?
अगणित दिधले धान्य कापुनी, शूद्रा क्षेपुर तुम्हीच ना ?
रत्नाईचे कुष्ठ दवडिले, तीर्थे वर्णित तुम्हीच ना ?
आठही ग्रामी भिक्षा केली, दीपवाळी दिनी तुम्हीच ना ?
भास्कर हस्ते चार सहस्रा, भोजन दिधले तुम्हीच ना ?
निमिषमात्रे तंतुक नेला, श्रीशैल्यासी तुम्हीच ना ?
सायंदेवां काशीयात्रा, दाखविली गुरु तुम्हीच ना ?
चांडाळा मुखी वेद वदविले, गर्व हराया तुम्हीच ना ?
साठ वर्षे वांझेसी दिधले, कन्यापुत्रही तुम्हीच ना ?
कृतार्थ केला मानसपूजनी, नरकेसरी गुरु तुम्हीच ना ?
माहूरचा सतिपती उठवोनी, धर्म कथियला तुम्हीच ना ?
रजकाचा यवनराज बनवुनी, उद्धरिला गुरु तुम्हीच ना ?
अनन्यभावे भजता सेवक, तरतिल वदले तुम्हीच ना ?
कर्दळीवनीचा बहाणा करुनी, गाणगापुरी स्थित तुम्हीच ना ?
निर्गुण पादुका दृष्य ठेवूनि, गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना ?
विठाबाईचा दास मूढ परि, अंगीकारिला तुम्हीच ना ?
आत्मचिंतनी रमवा निशिदिनी, दीनानाथ गुरु तुम्हीच ना ?

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

श्री महालक्ष्मी अष्टकम Shri Mahalakshmi Ashtakam

Jaya Ekadashi 2026 जया एकादशी; शुभ योग, पूजा विधी आणि कथा जाणून घ्या

विठ्ठलाची आरती Vitthal Aarti

आरती गुरुवारची

Bhishma Dwadashi 2026 भीष्म द्वादशी व्रत करण्याचे म्हत्तव आणि पूजेची पद्धत

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

पुढील लेख
Show comments