श्रीगणेशाय नमः । ॐ गणेशदत्त गुरुभ्यो नमः । राहोनिया महाराष्ट्रात । लक्षावधींचे कल्याण करीत । मग तेथोनिया निघत । कृष्णातटाक यात्रेसी ॥१॥ श्रीक्षेत्र औदुंबर । दत्त स्थान मनोहर । कृष्णानदी तटाकतीर । तेथोनी यात्रा आरंभिती ॥२॥ भुवनेश्वरीचे घेवोनी दर्शन । प्रदक्षिणा आरंभिती तेथोन । ब्रह्मनाळ गणेशवाडी करोन ।...