Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रीदत्त विजय अध्याय नववा

Webdunia
शुक्रवार, 3 जून 2022 (14:53 IST)
श्रीगणेशाय नमः । ॐ गणेशदत्त गुरुभ्यो नमः । दर्शनासी लोक येत । तेणे उपद्रव होत । म्हणोनी एकांतात । जाती स्वामी कधी कधी ॥१॥
 
आश्रमाचे समिपत । डोंगर दर्‍या शेती असत । कधी कधी स्वामी जात । एकांताकारणे तेथवरी ॥२॥
 
ऐसेचि एकदा एकांतात । स्वामी बैसले ध्यानस्थ । एक सर्प तेथे येत । सुवर्ण रंगी तो असे ॥३॥
 
स्वामी सर्पाकडे पाहात । सर्प रुप पालटत । सात वर्षांचा कुमार तेथ । प्रकट पाहा होतसे ॥४॥
 
करोनी स्वामींसी नमस्कार । कुमार म्हणे दत्त दिगंबर । येवोनी आपण येथवर । उपकृत केले मजलागी ॥५॥
 
वर्षे दोन सहस्र । मी राहे येथवर । कधी सर्प रुपांत । अन्य रुपाने राहे कधी ॥६॥
 
हा सर्व परिसर । आपुलाच समजा येथवर । राहोनी आश्रम सत्वर । येथे एक बांधावा ॥७॥
 
ऐसे स्वामींसी विनवीत । निजरुप त्यासी दाखवीत । ते भव्य ऋषी असत । आश्वलायन नाम असे ॥८॥
 
असो ऋषी इच्छे प्रमाण । आश्रम होई निर्माण । ऋषींचे मूळ जे स्थान । मंदिर तेथे बांधले ॥९॥
 
असो एकांतातून । स्वामी आश्रमात येवोन । स्थिर तेथे राहोन । दुःख निवारीती लोकांचे ॥१०॥
 
एक प्रोफेसर येत । म्हणे कंबर दुखत । अनेक औषधोपचार केले म्हणत । वीस हजार खर्चिले ॥११॥
 
परी काही गुण न येत । स्वामी कृपा करा म्हणत । स्वामी तीर्थ देत । बरा होशील म्हणोनिया ॥१२॥
 
दुसरे दिनी दर्शना येत । म्हणे आज प्रथम अनेक वर्षात । तीन किलोमीटर चालत । दर्शनासी आलो मी ॥१३॥
 
अन्यथा थोडे जरी चालत । तरी कंबर दुखे अत्यंत । म्हणोनी कोठेही मी न जात । घरीच पडोन राहतसे ॥१४॥
 
ऐसे दुःखी कष्टी येत । स्वामी त्यांसी बरे करत । दोनशे लीटर तीर्थ । मंत्रोनी रोज करिती ते ॥१५॥
 
तैसेची यज्ञाची विभूति । सिद्ध मंत्रे तयार करिती । लोकांसी विभूति देती । व्याधी निवारणा कारणे ॥१६॥
 
एकदा एक स्त्री येत । पोटशूळ असे बहुत । स्वामी तीर्थ देते । पोटशूळ जाई निघोनिया ॥१७॥
 
मेडिकोंडूर गावातून । एका स्त्रिसी आणिती धरोन । आठ वर्षे झाली पूर्ण । रडत पाहा ती राहातसे ॥१८॥
 
स्वामी तीर्थ देत । प्राशन करी म्हणोनी सांगत । तीर्थ प्राशिता हसू लागत । रडे गेले पळोनिया ॥१९॥
 
ऐसे येती असंख्य । स्वामीकृपे बरे होत । श्रीस्वामी कल्पवृक्ष । कल्पिले सर्वां देतसे ॥२०॥
 
नागेश्वर नामक भक्त । विशाखापट्टण येथे राहात । सहाशे मैल दूर असत । स्वामीपासूनी गाव ते ॥२१॥
 
त्याच्या जावोनी स्वप्नांती । स्वामी सांगती तयाप्रती । सावध राही तुज वरती । गंडांतर आहे म्हणोनिया ॥२२॥
 
नागेश्वर सकाळी उठत । स्वप्न रात्रीचे आठवत । फोटो समोर उभा राहात । आणि प्रार्थना करितसे ॥२३॥
 
दत्त दिगंबर अवधूता । सर्वत्र चाले तुझी सत्ता । आमुचा एक तूची त्राता । गंडांतर हे टाळावे ॥२४॥
 
ऐसी प्रार्थना करोन । जाई कामावर निघोन । उंच ऐंशी फूटाहून । काम करीत होता तो ॥२५॥
 
वरोनी पडे अकस्मात । परी वरचे वरी झेली दत्त । दत्ताचे ते अदृश्य हात । न दिसती पाहा कोणासी ॥२६॥
 
अलगद हवेत तरंगत । हळूहळू खाली येत । खाली ढिगारा असत । कांच लोखंड तुकड्यांचा ॥२७॥
 
नागेश्वर मनी म्हणत । पडता त्या ढिगार्‍यात । मार लागेल बहुत । अंगात घुसती खिळे काचा ॥२८॥
 
परी दत्त अदृश्य रुपात । पकडोनी त्यासी ठेवीत । हळूहळू खाली आणित । आणि ठेविती जमिनीवरी ॥२९॥
 
त्या सर्व भंगार ढिगार्‍यात । छोटीसी जागा असत । जेमतेम पाऊले राहात । तेथे ठेविले भक्ताला ॥३०॥
 
ऐसा करुणेचा सागर । व्यापोनी राहे चराचर । असता शुद्ध अंतर । जीवन्मुक्ती देतसे ॥३१॥
 
रोज करावे ध्यान । कूटस्थी ठेवावे मन । ऐसे करता साधन । तृतीय नेत्र खुलतसे ॥३२॥
 
तृतीय नेत्र जव उघडत । देवदेवता दिसो लागत । चिदाकाशात प्रवेश प्राप्त । होतसे जाणा भक्ताचा ॥३३॥
 
डोळयासमोर अंधार दिसत । त्यासी भूताकाश म्हणत । अंधूक प्रकाश जव दिसत । चित्ताकाश त्या म्हणती ॥३४॥
 
पूर्ण शुद्ध होता चित्त । चित्ताकाश दिसो लागत । चित्ताकाशात दिसत । विविध स्तरातील देवता ॥३५॥
 
निळे स्वच्छ महाशून्य । चिदाकाश तेची पूर्ण । गुरु आणि परब्रह्म । चिदाकाशात दिसतसे ॥३६॥
 
ऐसे करावे साधन । एकांती बैसावे नयन झाकोन । कूटस्थी ठेवोनी मन । सोऽहम्‍ ध्यान साधावे ॥३७॥
 
हेचि साधन प्रहर । नित्य करावे निरंतर । तीन मासांती साक्षात्कार । द्त्तकृपेने होतसे ॥३८॥
 
व्हावी प्रगती अध्यात्मात । ऐसे ज्यासी वाटत । त्याने प्रतिदिनी नित्य । नेम करावा ध्यानाचा ॥३९॥
 
ध्याने ज्ञान होत । ध्याने मोक्ष मिळत । ध्यानाने देवता दिसत । तृतीय नेत्र खुलताची ॥४०॥
 
ऐसे स्वामी सांगत । सर्वां ध्यान करा म्हणत । जे कोणी ध्यान करीत । दिव्य अनुभव त्या येती ॥४१॥
 
गुंडू नरसिम्हाची पुतणी असत । चिटम्मा तिसी सर्व म्हणत । एक नागदेवता स्वामींसी सांगत । राहेन हिच्या आश्रयाने ॥४२॥
 
हिच्या आश्रये मी राहेन । आणि तुमची सेवा करेन । नागदेवता ऐसे म्हणोन । चिटम्मात शिरतसे ॥४३॥
 
सात वर्षांची ती असत । परी जव नागदेवता शिरत । सर्व कामे करु लागत । जेवण सुंदर करितसे ॥४४॥
 
ऐसा दत्त समर्थ । देवताही सेवा करत । देवदेवता येत । नित्य भेटण्या स्वामींना ॥४५॥
 
एकदा स्वामी मुंबईत । दीक्षितांचे घरी राहात । दीक्षितताईंसी म्हणत । रेणुकादेवी तुम्ही असा ॥४६॥
 
ताईंसी ते न पटत । तुम्ही काहीतरी बोलत । ऐसे स्वामींसी जव म्हणत । स्वामी म्हणती अवधारा ॥४७॥
 
तुम्ही देवी आहात । हे मी करीन सिद्ध । मेघल जवळ असत । ऐकोन ठेवी तिज म्हणती ॥४८॥
 
मुंबईत एक स्त्री असत । देवी तिच्याशी बोलत । तिच्याकडे जा म्हणोनी सांगत । ताई आणि मेघलला ॥४९॥
 
उभयता तिच्याकडे जात । ती त्यांचे करी स्वागत । म्हणे देवी मज सांगत । रेणुका येते म्हणोनिया ॥५०॥
 
रेणुका तव घरी येत । दत्त तिला पाठवत । वेणी आणिली असत । माझ्यासाठी रेणुकेने ॥५१॥
 
ती वेणी रेणुकेने । स्वहस्ते घालावी सांगणे । ऐसे म्हणोनी देवीने । सांगितले असे मजप्रती ॥५२॥
 
ऐसे स्त्री जव म्हणत । ताईंसी आश्चर्य वाटत । मेघलही आश्चर्यचकित । होवोनिया जातसे ॥५३॥
 
म्हणती स्वामी स्वयं दत्त । नरासी नारायण करीत । घरी येवोनी सांगत । वृत्तांत सर्व देवीचा ॥५४॥
 
स्वामी ताईंसी म्हणत । तुम्ही अनादि देवी असत । रेणुका कारण देहात । नित्य तुमच्या राहातसे ॥५५॥
 
महालक्ष्मी सूक्ष्मदेहात । राहोनी पाहा कार्य करीत । दुर्गा स्टेज तीन वर्षात । प्राप्त होईल तुम्हासी ॥५६॥
 
षोडषी त्रिपुरसुंदरी नित्य । राहे सोमचक्रात । तेणे सदगुण अनंत । असती तुमच्या माजी हो ॥५७॥
 
ऐसे स्वामी सांगत । मेघल होती ऐकत । तिची श्रद्धा बहुत । होती पाहा ताईंवरी ॥५८॥
 
तिसी स्वामी म्हणत । विशेष एक तुजप्रत । सांगतो ठेवी मनांत । श्रद्धा ताईंवरी म्हणोनिया ॥५९॥
 
जो ताईंवरी श्रद्धा ठेवीत । त्यासी ईश्वर प्रसन्न होत । परी हे कठीण कर्म असत । श्रद्धा ठेवणे ताईंवरी ॥६०॥
 
दुर्गा त्यांचे रक्षण करीत । जवळी कोणा टीकू न देत । विकल्प निर्माण करोनी मनात । दूर सर्वां ठेवितसे ॥६१॥
 
ऐसे मेघलला सांगत । अति शुद्ध तिचे चित्त । श्रीकृष्ण दर्शन देत । एके दिनी तिजलागी ॥६२॥
 
दुर्गा कवचाचे पाठ करीत । दुर्गा देवी दर्शन देत । कॅनडामध्ये जव राहात । देवी राहे सांगाती ॥६३॥
 
दुर्गा ताईंच्या रुपात । नित्य तिसी दर्शन देत । आणि मार्गदर्शन करीत । ध्यानामाजी येवोनिया ॥६४॥
 
देवी मंदिरात मेघल जात । अनेकदा ताई तेथे दिसत । कधी देवी प्रत्यक्ष सांगत । मीच ताई म्हणोनिया ॥६५॥
 
सदभक्तांच्या रक्षणार्थ । देवता मानव देहात । अवतरोनी कार्य करीत । परी कोणा न कळे ते ॥६६॥
 
ऐशा देवता अनंत । स्वामींसवे कार्य करीत । काही दिसत काही गुप्त । राहोनी कार्य करिती ते ॥६७॥
 
श्रीदत्त विजय दिव्य ग्रंथ । देवता राहती ग्रंथात । याची प्रचिती येत । श्रद्धावान भक्तांना ॥६८॥
 
ग्रंथ लेखन चालत । तव ताई ग्रंथ वाचीत । ग्रंथातूनी बाहेर येत । विविध चिन्हे देवांची ॥६९॥
 
ॐ चंद्रकोर चांदणी । बाहेर येती ग्रंथातूनी । ताई हे सर्व पाहोनी । विस्मित अति जाहल्या ॥७०॥
 
ताई म्हणती स्वामींप्रत । दिव्य ग्रंथ हा असत । केवळ लोककल्याणार्थ । निर्माण केला ग्रंथ हा ॥७१॥
 
या अध्यायाचे करिता पठण । गंडांतरे जाती टळोन । देवता देती दर्शन । ध्यान लागे भक्तांना ॥७२॥
 
॥ अध्याय नववा ॥ ॥ ओवी संख्या ७२ ॥
ALSO READ: श्रीदत्त विजय अध्याय दहावा

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

कालभैरवाष्टकम् Kalabhairava Ashtakam

Kotwal of Kashi काल भैरवाला काशीचा कोतवाल का म्हणतात?

Kaal Bhairav Ashtami 2024 भगवान कालभैरवाला प्रसन्न करण्याचे उपाय

आरती शुक्रवारची

Utpanna Ekadashi 2024: उत्पन्ना एकादशीला 3 प्रभावी उपाय करा, धन संकटपासून मुक्त व्हा !

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments