राजपुत्र विनवी तक्षकासी । मी एकलाची पितयाचे कुशी । भार्या चतुर्दश वर्षी । शिवपूजनी रत सदा ॥२१॥ नूतन झाले माझे पाणिग्रहण । गुंतले तेथे अंतःकरण । पाहीन मातापिताचरण । तेणे सर्वस्व पावलो ॥२२॥ आपण बुडालो नदीत । पिता माता दुःख करीत । पत्नी जीव त्यागील सत्य । हत्या पडे...