Dharma Sangrah

दिवाळीसाठी खास हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाची शेव

Webdunia
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020 (09:39 IST)
साहित्य-
2 वाटी हरभराच्या डाळीचे पीठ, 1 /2 चमचा काळी मिरपूड, चिमूटभर हिंग, 1 चमचा तिखट, 1 चमचा हळद, 1 चमचा गरम तेल (कणीक मळण्यासाठी), 1 कप पाणी, मीठ चवीपुरती, तेल (तळण्यासाठी).
 
कृती - 
सर्वप्रथम एका भांड्यात हरभरा डाळीचे पीठ चाळणीने चाळून घ्या. या मध्ये काळी मिरपूड, तिखट, हिंग, 1 चमचा गरम तेल आणि मीठ असे सर्व जिन्नस घालून चांगल्या प्रकारे मिसळा. थोडं थोडं पाणी घालून मऊसर कणीक मळून घ्या. शेव करण्याचे मशीन किंवा सौर्‍याला आतून तेलाचा हात लावून भिजवलेल्या कणकेचे एक भाग भरून घ्या. त्या संचाला बारीक छिद्रांची जाळी लावा आणि संच घट्ट बंद करून द्या. 
 
एका कढईत तेल तापवायला ठेवा तेल गरम झाल्यावर मध्यम आचेवर कढईच्या वर शेवेचे मशीन धरा आणि वरून दाब देऊन आणि हळुवार कढईत मशीन गोल गोल फिरवत शेव सोडा. शेवेला मध्यम आच वर सोनेरी रंग येई पर्यंत तळून घ्या. तेल निथरुन शेव ताटलीत काढा, खमंग शेव खाण्यासाठी तयार.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आज तीळ द्वादशी, तीळ दान करण्याचे महत्त्व, सुंदर कथा जाणून घ्या

गुरुवारी साई चालीसा पाठ करा, बाबांचा आशीर्वाद मिळवा

आरती गुरुवारची

करिदिन संपूर्ण माहिती

शिवपुराणानुसार भगवान शिवाने मृत्यूची ही ८ लक्षणे सांगतिली आहेत

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

पुढील लेख
Show comments