Dharma Sangrah

धनत्रयोदशी पूजन करण्याची सोपी पद्धत

Webdunia
शनिवार, 22 ऑक्टोबर 2022 (08:05 IST)
जीवनातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आरोग्य, म्हणून आयुर्वेदाची देवता धन्वंतरी यांच्या अवताराचा दिवस, म्हणजेच धनत्रयोदशी हा सण आरोग्याच्या रूपाने संपत्तीच्या प्राप्तीसाठी साजरा केला जातो. चला जाणून घेऊया धनत्रयोदशी म्हणजे काय आणि याची पूजा पद्धत काय- 
 
धनत्रयोदशी पूजा विधी
या दिवशी सकाळी लवकर उठून नित्य कामातून निवृत्त होऊन पूजेची तयारी करावी. घराच्या ईशान्य कोपर्‍यातच पूजा करावी. पूजेच्या वेळी आपले मुख उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे.
 
पूजेच्या वेळी पंचदेवाची अवश्य स्थापना करावी. सूर्यदेव, श्री गणेश, दुर्गा, शिव आणि विष्णू यांना पंचदेव म्हणतात. पूजेच्या वेळी घरातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन पूजा करावी. 
 
पूजेचे दरम्यान कोणताही आवाज करू नये.
 
या दिवशी धन्वंतरी देवाची पूजा करावी, म्हणजेच 16 क्रियांनी पूजा करावी. पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, दागिने, गंध, फूल, धूप, दिवा, नैवेद्य, तांबूल, स्तवपाठ, तर्पण आणि नमस्कार. पूजेच्या शेवटी सांगता सिद्धीसाठी दक्षिणाही अर्पण करावी.
 
यानंतर धन्वंतरी देवासमोर उदबत्ती आणि दिवा लावावा. त्यानंतर हळद-कुंकू, चंदन आणि अक्षता अर्पित कराव्यात. त्यानंतर हार आणि फुले अर्पण करावीत.
 
पूजेमध्ये सुगंध म्हणजेच चंदन, कुमकुम, अबीर, गुलाल, हळद इत्यादी अर्पित करावे. उपासना करताना त्यांच्या मंत्रांचा जप करावा.
 
पूजा केल्यानंतर नैवेद दाखवावा. प्रसादासाठी मीठ, मिरची, तेल वापरू नये. प्रत्येक ताटावर तुळशीचे पान ठेवावे.
 
शेवटी त्यांची आरती करून नैवेद्य दाखवून पूजेची सांगता होते.
 
मुख्य पूजेनंतर प्रदोष काळात मुख्य दार किंवा अंगणात दिवे लावावे. तसेच यमाच्या नावाने दिवा लावावा. रात्री घराच्या कानाकोपऱ्यात दिवे लावावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती मंगळवारची

आरती सोमवारची

Shri Kashi Vishwanath Stotram श्री काशीविश्वनाथ स्तोत्रम्

Narmada Jayanti 2026: नर्मदा जयंती तिथी, पूजा विधी, कथा आणि संपूर्ण माहिती

रथ सप्तमी व्रत कथा

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

पुढील लेख
Show comments