rashifal-2026

बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा मंगल आणि उत्कृष्ट सण-भाऊबीज

Webdunia
दीप+आवली (रांग) म्हणजे दीपावली. आनंद, उत्साह, चैतन्य घेऊन येणारी दिवाळी आपल्याबरोबर आश्‍विन वद्य द्वादशीपासून कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत सणांची रांगच घेऊन येते. गरीब-श्रीमंत-लहान-थोर या सार्‍यांच्या अंत:करणात स्नेहभाव जागवते. नरक चतुर्दशीपासून ते भाऊबीज हे चार दिवस दिवाळीत प्रमुख मानले जातात; परंतु विजयादशमीपासून या उत्सव सोहळ्याची प्रक्रिया सुरू होते. आश्‍विन वैद्य द्वादशीला गोवत्स दशमी किंवा वसुबारस म्हणतात. स्त्रिया उपवास करून संध्याकाळी भक्तिभावाने धेनूची पूजा करतात. आश्‍विनी वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हणतात. भगवान श्रीकृष्णाने दुष्ट नरकासूर राक्षसाचा वध करून स्त्रियांची मुक्तता केली. ही घटना आश्‍विन वद्य चतुर्दशीला घडली. तेव्हापासून तो दिवस दीपोत्सव म्हणून साजरा होतो. आश्‍विन वद्य अमावास्येला लक्ष्मीपूजन म्हणतात. उदार बळीराजाच्या स्मरणार्थ लोक बळीची पूजा करतात.दिवाळीचा अत्यंत महत्त्वाचा महत्तम - मौलिक सण म्हणजे भाऊबीज होय. यास यमद्वितीयाही म्हणतात. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवावयास गेला व नरकात पिचत पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरते मोकळे केले. म्हणून या दिवशी भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने भावाला ओवाळावे. बहीण-भावाच्या प्रेमाचा हा अत्यंत मंगल दिवस 'भाऊबीज' म्हणून साजरा केला जातो.बहीण भावाला आदराने, प्रेमाने ओवाळते. आपल्या भावाला अपमृत्यू येऊ नये, तो चिरंजीव राहावा, अशी ती प्रार्थना करते. अपमृत्यू निवारणार्थ 'श्री यमधर्मप्रीत्यर्थ यमतर्पणं करिष्ये।' असा संकल्प करून यमाचे १४ नावांनी तर्पण करावे. हा विधी पंचांगात असतो. याच दिवशी यमाला दीपदान करावयाचे असते. यम ही मृत्यूची देवता आहे. प्रत्येकाला मरण अटळ आहे. ही जाणीव सतत असणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याकडून वाईट कार्य व धनाचा अपव्यच होणार नाही. तेव्हा यमाला दीपदान करून सांगावयाचे की, 'हे यमा, या दीपाप्रमाणे आम्ही सतर्क आहोत. जागरूक आहोत. त्याचे प्रतीक असलेला दीप तुला अर्पण करत आहोत. त्याचा स्वीकार कर. कारण तुझे आगमन केव्हा होईल, हे आम्हाला माहिती नाही.'या दिवशी बहीण भावाला औक्षण करते. भाऊ नसेल तर बहीण चंद्राला ओवाळते. बहीण-भावाच्या अमर प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा दिवाळीतील सवरेत्तम सण होय. बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा इतका मंगल आणि उत्कृष्ट सण नाही. बंगालमध्ये नडिया जिल्ह्यात विरही गावी 'भातृद्वितीया' जत्रा भरते. भाऊबीजेच्या दिवशी भरणारी ही एकमेव जत्रा आहे. उत्तर प्रदेशात तर भाऊबीजेचे व्रत असते. त्या दिवशी स्त्रिया संपूर्ण अंगणभर तांदळाच्या पीठाच्या भव्य रांगोळ्या काढतात.भावाला ओवाळण्याची प्रथा मात्र भारतात सर्वत्र आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

मकर संक्रांती 2026 मुहूर्त, पूजा साहित्य, संपूर्ण पूजा विधी, सुगड पूजन, आरती

Lohri 2026 Special Dishes लोहरी विशेष बनवले जाणारे खास पदार्थ

मंगळवारी हनुमान चालीसा पठण किती वेळा करावे?

Bhogi 2026 Wishes in Marathi भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

Lohri Wishes in Marathi 2026 लोहरीच्या शुभेच्छा मराठीत

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

पुढील लेख
Show comments