Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Mahalakshmi's favorite foods : महालक्ष्मीच्या आवडत्या पदार्थांचा दाखवा नैवेद्य आणि देवीला करा प्रसन्न

Webdunia
सोमवार, 24 ऑक्टोबर 2022 (07:20 IST)
दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीला हे नैवेद्य अर्पण केल्यास देवीची कृपा आपल्यावर नेहमीच राहणार. पण लक्षात ठेवा की लक्ष्मीची पूजा नेहमीच श्रीहरी विष्णू यांच्यासह करावी. 
 
लक्ष्मीला धनाची देवी मानले आहे. असे म्हणतात की पैशा नाही तर सगळं काही व्यर्थ आहे. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी त्यांचे आवडते नैवेद्य अर्पण करावे.
 
लक्ष्मी भोग :
1 केशरी भात किंवा दूध पोहे - पिवळ्या रंगाच्या केशरी भात देवीला अर्पण करून त्यांना प्रसन्न केले जाऊ शकते. आपण दूध पोह्‍याचा नैवैद्य देखील दाखवू शकतात.
 
2 पिवळ्या किंवा पांढर्‍या रंगाची मिठाई - देवी लक्ष्मीला पिवळे आणि पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा गोड खाद्य पदार्थ दिले जातात.
 
3 खीर - माता लक्ष्मीला तांदळाच्या खिरीमध्ये किशमिश, चारोळ्या, मखाणे आणि काजू घालून अर्पित करावे.
 
4 शिरा - साजूक तुपाचा शिरा देवी आईला अत्यंत प्रिय आहे. 
 
5 ऊस - दिवाळीच्या दिवशी पूजनात ऊस ठेवण्यात येतात कारण लक्ष्मीच्या पांढऱ्या हत्तीला हे फार आवडतात.
 
6 शिगांडा - शिंगाडा लक्ष्मीला खूप प्रिय आहे. याची निर्मिती देखील पाण्यातून होते.
 
7 मखाणे - ज्या प्रकारे लक्ष्मीची उत्पत्ती सागरातून झाली आहे. त्याच प्रकारे मखाणे देखील पाण्यातून उत्पन्न झाले आहे. मखाणे कमळाच्या वनस्पतीपासून मिळतात.
 
8 बत्ताशे - बत्ताशे देखील लक्ष्मीला आवडतात. रात्रीच्या पूजेत लाह्यांसह बत्ताशे अर्पण करतात.
 
9 नारळ - नारळाला श्रीफळ देखील म्हणतात. या मध्ये शुद्ध पाणी भरलेले असते. श्रीफळ असल्याने देवीला हे आवडतात.
 
10 पान - आई लक्ष्मीच्या पूजेत गोड पानाचे खूप महत्त्व आहे. हे आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहे.
 
11 डाळिंब - आई लक्ष्मीला फळांमध्ये डाळिंब फार आवडतात. दिवाळीच्या पूजेत डाळिंब अर्पण करा. 
 
या शिवाय पूजेच्या वेळी 16 प्रकारांची करंजी, पापडी, अनारसे, लाडू यांचे नैवेद्य दाखवावे. विनवणीत पुलहरा अर्पण करुन नंतर तांदूळ, बदाम, पिस्ते, खारीक, हळकुंड, सुपारी, गहू, नारळ, अर्पण करण्याची देखील पद्धत आहे. 
 
तसेच केवड्याचे फुले आणि आम्रबेलचा नैवेद्य अर्पण करतात. जर एखादा व्यक्तीने एक लाल फुल लक्ष्मीच्या देऊळात अर्पित करून त्यांना हे नैवेद्य दिले त्यांच्या घरात शांती आणि समृद्धी राहते आणि त्यांना कोणत्याही प्रकारची कमतरता भासत नाही.

Edited by : Smita Joshi 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

दत्त जयंती विशेष रेसिपी : केशरी भात

श्री गुरुदेव दत्तपीठ देवगड

Srikshetra Gangapur Yatra दत्त भक्तांची पंढरी, श्रीक्षेत्र गाणगापूर

।। श्री दत्तगुरूंची आरती ।।

श्रीदत्त क्षेत्र औदुंबर Shri Datta Kshetra Audumbar

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments