Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिवाळीला सुंदर दिसण्यासाठी घरगुती फेसपॅक

Webdunia
गुरूवार, 5 नोव्हेंबर 2020 (14:07 IST)
सणासुदी जवळ येतातच कामाचा व्याप वाढून जातो. धावपळ, दगदग, घराची स्वच्छतेपासून सजावटी आणि खाण्या -पिण्याच्या बाबतीत स्वतःसाठी वेळच मिळत नाही. अश्या मध्ये जेव्हा कुटुंबियांसह आणि मित्रांसह वेळ घालवताना फोटो काढण्याच्या वेळी आपल्या चेहऱ्यावरील तेज नाहीसा होतो. पण घरात बसून देखील चेहऱ्याचा तजेल पणा सहजपणे मिळवू शकतो. या साठी काही घरगुती फेसपॅकची गरज असणार. चला तर मग जाणून घेऊया की या फेसपॅक मुळे आपली त्वचा कशी चकाकेल. 
 
पार्लरच्या महागड्या फॅशियल आणि क्लीनअपने मिळणारा तजेलपणा देखील या घरगुती फेसपॅक ने मिळवू शकता. या साठी आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागणार.
 
* 1 चमचा नारळाच्या दुधासह 1/4 चमचा हळद मिसळा. या पॅकने आपल्या त्वचेची मालीश करा. आणि याला 15 मिनिटे तसेच राहू द्या. कोमट पाण्याने याला धुऊन घ्या. त्वचेच्या कोणत्याही समस्येसाठी हळद ही सर्वोत्तम मानली जाते. चमकती त्वचा मिळविण्यासाठी, टॅन काढण्यासाठी आणि मुरुमांशी लढण्यासाठी या पॅकचा वापर करावा. हे अँटी ऑक्सिडंटने भरपूर असतं. जे छिद्र स्वच्छ करून नैसर्गिक चमक देतं.
 
* दूध किंवा पाण्यात बदाम रात्रभर भिजत ठेवा. सकाळी याची मऊ अशी पेस्ट बनवा. या पेस्टला आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर समान रीतीने लावा आणि 15 ते 20 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर थंड पाण्याने धुऊन घ्या. व्हिटॅमिन इ आणि लॅक्टिक ऍसिडमध्ये भिजत टाकल्यानं आपल्या त्वचेच्या जटिलतेत सुधारणा होईल आणि त्वचा मऊ होईल त्याच सह चकाकी येते. त्वरितच चमक मिळविण्यासाठी हे एक सोपे पॅक आहे.
 
* सर्वप्रथम उडदाची डाळ वाटून त्याची भुकटी बनवा. आता या मध्ये चिमूटभर हळद आणि गरजेपुरतं पाणी घाला. तयार झालेल्या पेस्टला चेहऱ्यावर लावून काही काळ वाळू द्या आणि नंतर स्क्रब करत चेहऱ्याला हळुवार हाताने मालीश करा.

संबंधित माहिती

श्री आनंदनाथ महाराज कृत श्रीगुरुस्तवन स्तोत्र

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

आरती मंगळवारची

श्री स्वामी समर्थ आरती Swami Samarth 3 Aartis

श्री स्वामी समर्थ काकड आरती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments