सर्वप्रथम सर्व साहित्य तांदळाचे पीठ, दही, लोणी, हळद, हिंग, तीळ, आलं- लसूण पेस्ट, मीठ एका भांड्यात एकत्र करा. थोडे थोडे पाणी घालून कणीक मळून घ्या. या मळून ठेवलेल्या कणकेचे चार भाग करा. वेगळे ठेवून द्या. कणकेचा एक भाग घेऊन याला चकलीच्या साच्यात घाला. एका ताटलीत मधून फिरवून चकलीचा आकार द्या. त्याच्यावर थोडा दाब द्या.
आता एका कढईत तेल तापवायला ठेवा. गरम तेलात हळुवार हाताने चकली सोडा आणि मध्यम आंचेवर तळून घ्या. दोन्ही बाजूने तांबूस रंग येई पर्यंत तळून घ्या.
तळलेल्या चकल्या टिशू पेपर वर काढून ठेवा. गरम खमंग खुसखुशीत चकली तयार.