Marathi Biodata Maker

नरक चतुर्दशी कथा Narak Chaturdashi Katha

Webdunia
सोमवार, 17 ऑक्टोबर 2022 (16:51 IST)
आश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी म्हणतात. या सणाशी निगडित एक कथा आहे. पुराणानुसार ही कहाणी आहे नरकासुराची. नरकासुर हा एक दुष्ट आणि दंभी असुर होता. ज्यावेळी विष्णूंनी पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी वराह अवतार घेतला, त्या वेळी ह्याचा जन्म पृथ्वीच्या गर्भेतून झाला होता. याचा जन्म झाल्यावर राजा जनकने नरकासुराचा सांभाळ केला पृथ्वीच्या गर्भातून त्याचा जन्म झाल्यामुळे पृथ्वी आपल्या बरोबर त्याला विष्णुलोकात घेऊन गेली.
 
विष्णूंनी त्याला प्राग्ज्योतिषपूर राज्याचे कारभार सांभाळायला सांगितले. श्री विष्णूंनी त्याला एक दुभेथ रथ दिले होते. नरकासुर हा मथुरा नरेश कंस याचा मित्र होता. नरकासुराचे लग्न विदर्भेच्या राजकन्या मायाशी झाले असे. नरकासुराने आपले राज्य काही काळ व्यवस्थित केले पण त्याची मैत्री बाणासुराशी होती त्यामुळे त्याचा संगतीत राहून तो लोकांवर अत्याचार करायचा. सर्वीकडे त्याने आपल्या अत्याचाराने उच्छाद मांडला होता. त्याच्या जाचाला वैतागून एकदा ऋषी वशिष्ठ यांनी त्याला तुझी मृत्यू श्री विष्णूंच्या हस्ते होणार असे श्राप देखील दिले होते. त्या श्रापापासून वाचण्यासाठी त्याने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या केळी आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न केले आणि त्यांच्या कडून मला कोणीही मारू शकणार नाही असे वर मागितले.
 
वर मिळवून त्याने स्वतःला अजेय समजून अनेक राजांना बंदिस्त करून त्यांच्या बायका, मुलींवर अत्याचार केले. त्याने तब्बल 16,100 बायकांना आपल्या कारागृहात दामटून ठेवले. त्याच्या अत्याचाराला सगळेच कंटाळले होते. सगळे देव, गंधर्व, मानवांना त्याचा त्रास होत होता. ते सगळे श्री विष्णूंकडे गेले. विष्णूंनी त्याला मारण्याचे ठरविले आणि कृष्णाच्या रूपात येऊन त्यांचा संहार केला. त्याचे महाल वेगवेगळ्या खंदकाने पाण्याने, अग्नीने वेढलेले होते. कृष्णाने गरूडावर बसून नरकासुराचे दोन तुकडे पाडले आणि त्याचा वध केला.
 
कृष्णाने नरकासुराच्या कारागृहात बंदिवान असलेल्या 16,100 मुलींची सुटका केली. आता प्रश्न असा होता की या बंदिवान झालेल्या मुलींचा स्वीकार करणार कोण?
 
असे लक्षात घेत कृष्णाने त्या 16,100 मुलींसह लग्न करून त्यांचा स्वीकार करून त्यांना मान मिळवून दिले. नरकासुराशी युद्ध करताना नरकासुराच्या रक्ताच्या काही थेंब कृष्णावर पडले होते ते स्वच्छ करण्यासाठी कृष्णाने तेल लावून स्नान केले होते. म्हणून तेव्हा पासून या दिवशी तेल लावून अभ्यंग स्नानाची प्रथा पाडली गेली.
 
नरकासुराचा अंत झाल्यावर त्याच्या आईने म्हणजेच पृथ्वी देवीने सर्वाना सांगितले की कोणीही त्याच्यांसाठी शोक करू नये. या उलट हा दिवस आनंदानं सण म्हणून साजरा करायचा. त्या वेळी पासून नरक चतुर्दशीचा सण साजरा करण्यात येतो.
 
या दिवशी तेल लावून उटण्याने अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आहे. या दिवशी लवकर उठून अभ्यंग स्नान केल्याने सर्व संकट दूर होतात असे म्हटले गेले जाते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Bhanu Saptami 2026 रविवारी भानुसप्तमी, 4 राजयोग, या 3 राशीच्या जातकांसाठी शुभ

Narmada Aarti in Marathi नर्मदा आरती मराठीत

Ratha Saptami 2026 रथ सप्तमी बद्दल संपूर्ण माहिती

शनिवारची आरती

श्री शनिदेव आरती Shri Shani Aarti

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

पुढील लेख
Show comments