Festival Posters

Tulsi Vivah 2025 Katha तुळशी विवाह कथा

Webdunia
रविवार, 2 नोव्हेंबर 2025 (10:15 IST)
तुळशी विवाह कथा
 
कांची नगरात कनक नावाचा राजा होता. त्याला नवसाने एक मुलगी झाली. तिचे नाव किशोरी असे होते. तिची पत्रिका पाहून ज्योतिषाने सांगितले जो तिच्याशी विवाह करेल त्याच्या अंगावर वीज पडून त्याला मरण येईल. एका ब्राह्मणाने किशोरीला द्वादशाक्षरी विष्णू मंत्र सांगितला. त्यांनी सांगितले की मंत्राचा जप करावा, तुळशीचीपूजा व कार्तिक शुद्ध नवमीला तिचा विष्णूशी विवाह लावावा. मुलगी सांगितल्याप्रमाणे व्रत करू लागली.
 
एकदा एक गंध्याने तिला पाहिले व तो तिच्यावर मोहित झाला. तो माळिणीच्या मदतीने स्त्री वेष घेऊन माळिणीबरोबर किशोरीकडे आला. ती माळीण म्हणाली ही माझी मुलगी आहे. फुलांची रचना करण्यात तरबेज आहे. तुला देवासाठी फुलांच्या नाना प्रकारच्या रचना करून देत जाईल. गंधी किशोरीकडे दासी म्हणून राहू लागला. इकडे एका राजाचा पुत्र मुकुंद हा देखील त्या किशोरीवर मोहित झाला होता. तो सूर्याची खूप उपासना करत असे तेव्हा सूर्याने स्वप्नात दृष्टांत देऊन त्याला सांगितले की तू किशोरीचा नाद सोडून दे. कारण तिच्याशी विवाह करणारा वीज पडून मरेल. 
 
यावर मुकुंद सूर्याला म्हणाला तुझ्यासारख्या देवाला तिचे वैधव्य टाळता येईल. तसेच किशोरी मला लाभली नाही तर मी अन्न पाणी वर्ज्य करून मरून जाईन. सूर्याने किशोरीच्या वडलांना दृष्टांत देऊन सांगितले की राजपुत्र मुकुंदाला तू आपली मुलगी दे. कनकराजाला हा विवाह मान्य करणे भाग पडले. 
 
कार्तिक द्वादशी ही लग्नाची तिथी ठरली. गंध्याला हे सर्व कळल्यावर तो खूप दुःखी झाला. त्याने ठरवले की लग्न मंडपात जाण्याआधी तिचा हात धरायचा. त्याच वेळी मेघगर्जनांसह विजा कडकडल्या. किशोरीही भांबावून गेली व ती बाहेर आली व गंध्याने तिचा हात धरला व त्याच क्षणी गंध्याच्या डोक्यावर वीज कोसळली व तो मरण पावला. नंतर राजपुत्र मुकुंद याच्याशी तिचा विवाह झाला. तुळशी व्रताच्या प्रभावाने किशोरीचे वैधव्य टळले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Bhishma Dwadashi 2026 भीष्म द्वादशी व्रत करण्याचे म्हत्तव आणि पूजेची पद्धत

स्वामींना मनातील प्रश्न कसा विचारावा? ४ पद्धती जाणून घ्या

28 जानेवारी रोजी भक्त पुंडलिक उत्सव पंढरपूर

Jaya Ekadashi 2026 जया एकादशी कधी? शुभ योग, पूजा विधी आणि कथा जाणून घ्या

Hanuman 108 Names : मंगळवारी मारुतीचे १०८ नावांचा जप केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

पुढील लेख
Show comments