Dharma Sangrah

Vasubaras 2024 वसुबारस संपूर्ण माहिती आणि पूजा करण्याची योग्य पद्धत

Webdunia
Vasubaras 2024 आश्विन कृष्ण द्वादशीस वसुबारस साजरी केले जाते. गोवत्सद्वादशी म्हणजे गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. वसु म्हणजे द्रव्य अर्थात धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असे म्हणतात.
 
हिंदू धर्मात गाईला महत्वाचे स्थान असून तिचा सन्मान करण्याचा हा दिवस. या दिवशी गाईची पाडसासह पूजा करतात. 
 
वसुबारस पूजा विधी-
या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळीची सुरुवात होते.
घरी गुरे, वासरे असणार्‍यांकडे ह्या दिवशी पुरणा-वरणाचा स्वयंपाक करुन नैवेद्य दाखवला जातो. 
सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सायंकाळी संवत्स म्हणजे वासरासह असलेल्या गायीचे पूजन करतात.
सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. 
नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. 
निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. 
स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात.
आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.
या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. 
घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.
ALSO READ: वसुबारस पौराणिक कथा

कामधेनुची आरती
आरती कामधेनु 
तुमचा महिमा किती वर्णु
आरती मोक्षधेनु ।। धृ ।।
गाईचे चरणतीर्थ ब्रह्मा विष्णु महेश्वर
म्हणुनि वंदिले यथार्थ 
शोडषोपचारी मंत्र 
नमियेला भगवंत 
आरती कामधेनु ।। १ ।।
तुझी सोनियाची शिंगे 
त्याला रूपियाचे खुर
पुच्छ तुझे वाहे गंगा 
पाप जाईल हो दूर 
आरती कामधेनु ।। २ ।।
विठोबा रखुमाई दोघे
गाई आणियेला वळवुनी
दूध जे काढियेलं
दिलं रखुमाई करी 
आरती कामधेनु ।। ३ ।।

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती मंगळवारची

आरती सोमवारची

Shri Kashi Vishwanath Stotram श्री काशीविश्वनाथ स्तोत्रम्

Narmada Jayanti 2026: नर्मदा जयंती तिथी, पूजा विधी, कथा आणि संपूर्ण माहिती

रथ सप्तमी व्रत कथा

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

पुढील लेख
Show comments