Festival Posters

बलिप्रतिपदा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त

वेबदुनिया
WD
बलिप्रतिप्रदेची कथा अशी
बलिराजा हा अत्यंत दानशूर होता. दारी येणारा अतिथी जे मागेल ते त्याला तो दान देत असे. दान देणे हा गुण आहे, पण गुणांचा अतिरेक हा दोषार्हच असतो. कोणाला काय, केव्हा व कोठे द्यावे याचा निश्चित विचार आहे व तो शास्त्रात व गीतेने सांगितला आहे. सत्पात्री दान द्यावे. अपात्री देऊ नये. पण बलिराजा कोणालाही केव्हाही जे मागेल ते देत असे. अपात्र माणसांच्या हाती संपत्ती गेल्याने ते मदोन्मत होऊन वाटेल तसे वागू लागतात. तेव्हा भगवान विष्णूने मुंजा मुलाचा अवतार घेतला. वामन म्हणजे लहान मुंजा मुलगा असतो व तो ओम भवति भिक्षां देही। म्हणजे भिक्षा द्या असे म्हणतो. विष्णूने वामनावतार घेतला व बलीराजाकडे जाऊन भिक्षा मागितल्यावर त्याने विचारले, काय हवे? तेव्हा वामनाने त्रिपाद भूमिदान मागितले. वामन कोण आहे व या दानामुळे काय होणार याचे ज्ञान नसल्याने बलिराजने त्रिपाद भूमी या वामनाला दान दिली. त्याबरोबर या वामनाने विराट रूप धारण करून एका पायाने सर्व पृथ्वी व्यापून टाकली. दुसर्‍या पायाने अं‍तरिक्ष व्यापले व तिसर्‍या पाय कोठे ठेवू असे बलिराजास विचारले, तिसरा पाया आपल्या मस्तकावर ठेवा असे ‍बलिराजा म्हणाला. तेव्हा तिसरा पाय त्याच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळात घालावयाचे असे ठरवून वामनाने 'तुला काही वर मागावयाचा असेल तर माग असे बलिराजास सांगितले. तेव्हा 'आता पृथ्वीवरील माझे सर्व राज्य संपणार आहे व आपण मला पाताळात घालविणार आहात, तेव्हा तीन पावले टाकण्याने जे सर्व घडले ते पृथ्वीवर प्रतिवर्षी तीन दिवस तरी माझे राज्य म्हणून ओळखले जावे असा त्याने वर मागितला. ते तीन दिवस म्हणजे आश्वीन कृष्ण चतुर्दशी, आमावस्या व कार्तिक शुद्ध प्रतिपदा याता बलिराज्य असे म्हणतात.

बलिराज्यात आपल्या मनाला वाटेल तसे लोकांनी वागावे असे धर्मशास्त्र सांगते, मात्रशास्त्राने सांगितलेली निषिद्ध कर्मे सोडून, अभक्ष्‍य भक्षण, अगभ्यागमन ही निषिद्ध कर्मे आहेत म्हणून या दिवसांत माणसे दारू उ‍‍डवितात पण दारू पीत नाहीत. शास्त्राने परवानगी दिली असल्याने परंपरेने लोक या दिवसांत मौजमजा करतात. अशीही दिवाळी बलिप्रतिपदेच्या दिवशी जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बली व त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांनी पूजा करावी त्यांना मद्यमांसाचा नैवेद्य दाखवावा. यानंतर बलिप्रीत्यर्थ दीप व वस्त्रे यांचे दान करतात. दिवाळीतला हाच दिवस प्रमुख समजला जातो. या दिवशी लोक नवी वस्त्रावरणे करून सर्व दिवस आनंदात घालवितात. या दिवशी गोवर्धनपूजा करण्याची प्रथा आहे. त्यासाठी शेणाचा पर्वत करुन त्यावर दुर्वा व फुले खोचतात व कृष्ण, गोपाळ, इंद्र, गायी, वासरे यांची चित्रे शेजारी मांडून त्यांचीही पूजा करतात व मिरवणूक काढतात.
सर्व पहा

नवीन

श्री हनुमान चालीसा Hanuman Chalisa

शनिवारी हे 5 मंत्र जपा, शनीची कृपादृष्टी मिळवा

शनिवारची आरती

Baby girl names inspired by Lord Rama प्रभू श्रीराम यांच्या नावावरुन मुलींची नावे

Christmas 2025 Wishes In Marathi नाताळच्या शुभेच्छा

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

Show comments