rashifal-2026

व्यक्तिविशेष : दिलीप पुरुषोत्तम चित्रे

वेबदुनिया
WD
17 सप्टेंबर 1938 रोजी बडोदा येथे जन्मलेले दिलीप पुरुषोत्तम चित्रे हे स्वातंत्र्योत्तर काळातील एक प्रभावी व प्रयोगशील नवकवी, कथाकार, समीक्षक व विचारवंत म्हणून ओळखले जातात.

भोवतालचे समाजजीवन, भाषा यातून प्राप्त होणारे परंपरेचे संचित, वाङ्‍मयीन रूपसंकल्पना नाकारणारा हा कवी इथिओपियात 3 वर्षे शिक्षक आणि नंतर इंडियन एक्सप्रेसच्या कलाविभागात अधिकारी होता. आपल्या वेगळेपणाची, जीवनातील असंबद्धतेची जाणीव, मृत्यूची अटळता आणि जबर जीवनेच्छा यांच्याबरोबरच भेडसावणारे एकाकीपण त्यांनी आपल्या कवितेतून मांडले. त्यांच्या कवितेत ऐंद्रिय संवेदना व प्रेमाला महत्त्व दिल्याचे जाणवते. मराठीतल्या ‘शब्द’ ह्या पहिल्या अनितकालिकाचे प्रवर्तक असणार्‍या चित्रे यांनी ‘आधुनिक कवितेला सात छेद’, ‘शतकाचा संधिकाल’ अशा लेखमाला लिहिल्या. ‘कविता’, ‘पुन्हा कविता’ असे काव्यसंग्रह लिहिले. ‘सफायर’,‘रुधिराक्ष’ या लघुकादंबर्‍यांबरोबरच तुकारामांच्या निवडक अभंगांचा आणि ज्ञानदेवांच्या अमृतानुभवाचा इंग्रजी अनुवाद केला.
सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

World Meditation Day 2025: ध्यान म्हणजे काय, ते कसे सुरू करावे? त्याचे महत्त्व जाणून घ्या

21 डिसेंबर हा वर्षातील सर्वात लहान दिवस आहे, जाणून घ्या 5 मनोरंजक तथ्ये

हिरव्या मटारपासून बनवा झटपट दोन स्वादिष्ट पाककृती

घाईघाईने खाण्यामुळे आरोग्याला धोका होऊ शकतो, कसे काय जाणून घ्या

पीजी डिप्लोमा इन रेडिओग्राफी आणि इमेजिंग टेक्नॉलॉजी मध्ये कॅरिअर करा

Show comments