Dharma Sangrah

Diwali Special : चिरोटे (पाकातील)

Webdunia
साहित्य : रवा, मैदा, साखर, तूप, आंबट दही, केशर किंवा खाण्याचा केशरी रंग.

कृती : रवा व मैदा समप्रमाणात घ्यावा. त्यात चवीला मीठ व तेल किंवा तुपाचे मोहन घालून रवा व मैदा आंबट दह्यात भिजवावा. पिठाच्या दीडपट साखर घेऊन त्याचा दोन तारी पाक करावा व त्यात केशर किंवा खाण्याचा केशरी रंग घालावा व आवडत असल्यास लिंबू पिळावे. भिजविलेला रवा-मैदा कुटून त्याच्या किंचित जाडसर पोळ्या लाटाव्यात. त्यानंतर एका पोळीला तूप लावून, त्यावर दुसरी पोळी पसरावी व त्यालाही तूप लावावे. नंतर या जोडपोळीची साधारण एक इंच रुंदीची एकावर एक अशी घडी घालून, त्या संपूर्ण घडीचे एक इंच रुंदीचे चौकोनी तुकडे पाडावेत व ते तुकडे, पाहिजे असेल, त्याप्रमाणे चौकोनी किंवा लांबट लाटून, तुपात तळावेत व साखरेच्या पाकात सोडावेत. नंतर बाहेर काढून उभे करून ठेवावेत. पाक गरमच असावा. या प्रमाणेच सर्व पोळ्यांचे चिरोटे करावे त.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

रिलेशनशिप मध्ये क्लिअर कोडिंग ट्रेंड म्हणजे काय

नैतिक कथा : हुशार ससा

Saturday Born Baby Girl Names शनिवारी जन्मलेल्या मुलींसाठी नावे

शिंगाडयांची लागवड करतांना शेतकरी त्यांच्या शरीरावर इंजिन ऑइल का लावतात? माहिती आहे का तुम्हाला?

Republic Day 2026 Speech in Marathi प्रजासत्ताक दिनावर भाषण मराठीत

पुढील लेख
Show comments