suvichar

हिवाळा विशेष रेसिपी : टोमॅटो सूप

Webdunia
शनिवार, 11 जानेवारी 2025 (08:00 IST)
साहित्य-
टोमॅटो- 4
साखर -1/2 चमचा 
लोणी-1 चमचा 
काळे मिरे पूड -1/2 चमचा 
ब्रेड क्यूब्स - 5
काळे मीठ- 1/2 चमचा 
साय/ताजे क्रीम- 1 चमचा 
हिरवी कोथिंबीर- 1 चमचा 
चवीनुसार मीठ 
 
कृती 
टोमॅटो सूप बनवण्यासाठी सर्वात आधी टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यावे.आता या टोमॅटोचे मोठे तुकडे करावे.   आता एका भांड्यात दोन कप पाणी घालून मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवा. आता त्यात चिरलेला टोमॅटो घालावा. टोमॅटो शिजवून घ्यावा. टोमॅटो चांगले शिजून मऊ झाल्यावर गॅस बंद करा. आता टोमॅटो बाहेर काढून सोलून घ्यावे. यानंतर टोमॅटोचे सर्व तुकडे बारीक करूनघ्यावे. यानंतर टोमॅटोचा लगदा एका मोठ्या चाळणीतून गाळून त्याच्या बिया वेगळ्या कराव्या. सूप घट्ट वाटल्यास आवश्यकतेनुसार पाणी घालून पातळ करावे. यानंतर गॅसवर मध्यम आचेवर उकळण्यासाठी ठेवावे. सूपला उकळी आली की त्यात लोणी, काळे मीठ, साखर, मिरे पूड आणि चवीनुसार मीठ घालावे.आता पाच मिनिटे शिजवा. यानंतर गॅस बंद करावा. तर चला तयार आहे आपले चविष्ट आणि हेल्दी टोमॅटो सूप, त्यात ब्रेड क्यूब्स आणि हिरवी कोथिंबीर घालून नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

<>

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

रात्री नीट झोप लागत नसेल, तर झोपण्यापूर्वी या तीन गोष्टी करा

हृदयापासून पोटापर्यंत... ही योगासने सर्वांगीण आरोग्य सुधारतात

तेनालीराम कहाणी : कर्जाचे ओझे

Congratulation Message for 10th Students परीक्षेत यश मिळाल्याबद्दल अभिनंदन

30 नंतर महिलांनी lifestyle मध्ये करावेत हे बदल

पुढील लेख
Show comments