Marathi Biodata Maker

गाजर काजू करी

Webdunia
MHNEWS
गाजर-काजू करी तयार करण्यापूर्वीच थोडासा भात तयार करुन ठेवावा. त्यात दोन वाटी तांदळाला ३ वाटी पाणी घालावं. झाकण ठेऊन तो मंद आचेवर शिजवत ठेवावा. साधारणत: २० मिनिटांनी ते तयार होईल.

साहित् य : एक चमचा आल्याच्या तुकडा, एक चमचा मोहरी, एक चमचा हळद, दोन वाट्या चिरालेला कांदा, ४ लसून पाकळ्या, एक चमचा जिरे, धने व बडीशेप पावडर, चवीनुसार मीठ, २ मध्यम आकाराचे बटाटे (बारीक चिरलेले), ५ मोठी गाजरं (बारीक चिरलेले), १ वाटी दही, २ चमचे लिंबाचा रस, अर्धा चमचा मिरी पावडर आणि अर्धी वाटी काजूची पूड.

कृती : सर्वप्रथम गरम केलेल्या कढईतील तेल, आलं, लसूण, कांदा, बटाटा, गाजर एकत्र करुन घ्या. त्यात बडीशेप पावडर घालून मंद आचेवर ३ ते ५ मिनिटे उकळत ठेवा. उरलेला मसाला घालून पुन्हा उकळा आणि त्यात लिंबाचा रस घाला. ते झाकून ठेवून मंद आचेवर बटाटा नीट शिजेपर्यंत १५ मिनिटे उकळू द्या. परत त्यात मिरी पावडर घालून आणखी उकळू द्या.

कढी वाढताना गरमागरम वाढा. अगदी आयत्या वेळी त्यात दही घालावे. तयार केलेल्या भातावर काजूचे तुकडे पेरा.

- महान्यूज
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

Veer Savarkar Jayanti 2026 Speech in Marathi स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती भाषण मराठी

झणझणीत तोंडलीची भाजी; अगदी आवडीने खातील सर्वजण

उष्माघातापासून बचावासाठी ORS ठरू शकते संजीवनी! जाणून घ्या पिण्याचे जबरदस्त फायदे

भविष्यातील यशासाठी विद्यार्थ्यांनी ही कौशल्ये आजच आत्मसात करा

ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी आणि मऊ बनवण्यासाठी घरगुती उपायांबद्दल जाणून घ्या

Show comments