Dharma Sangrah

होळी स्पेशल : थंडाई

Webdunia
साहित्य : पंचवीस ते तीस बदाम-बी, दोन चमचे खसखस, आठ दहा पिस्ते, दोन-तीन चमचे काकडीचे बी, चार चमचे चारोळी, दोन चमचे बडीशोप, सात-आठ वेलदोडे, दहा-बारा दाणे पांढरी मिरी, थोडे बेदाणे, दोन ग्लास दूध, दोन ग्लास पाणी, पाच-सहा गुलाबकळ्या किंवा गुलाबाचे पाणी, साखर.

कृत ी : बादाम भिजत घालून, त्यांची साल काढून टाकावी. पांढरी मिरी नसल्यास काळ्या मिर्‍यांना पाणी लावून, हाताने चोळून त्यांची साल काढावी. नंतर बदामाचा गर, मिरी, वेलदोडे, खसखस, पिस्ते, काकडीचे बी, चारोळी, बडीशोप, बेदाणे हे सर्व जिन्नस एकत्र करून बारीक वाटावे. वाटून झाल्यावर तो गोळा व दूध व पाणी एकत्र करावे व गोड पाहिजे असेल त्या प्रमाणात साखर घालून चांगले ढवळावे.

साखर विरघळल्यावर त्याच गुलाबाचे पाणी घालावे. जास्त दाट वाटल्यास दूध किंवा पाणी जरूर असेल, ते घालावे. हवा असल्यास थोडा बर्फ घालून थंडाई पिण्यास द्यावी.
सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

पौराणिक कथा : होलिका आणि भक्त प्रल्हादाची गोष्ट

Baby Names Inspired by Colors रंगांवरून बाळांची सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

होळीचा रंग डोळ्यांत गेल्यास या चुका टाळा Eyes Safety Tips During Holi

Holi Dahan 2026 होळी दहन करतांना अर्पण केला जाणारा मुख्य नैवेद्य

४० वर्षांच्या वयातही प्रजनन क्षमता कायम राहील, Ovaries म्हातारे होण्यापासून वाचवतील हे '३ मॅजिकल फूड्स'

Show comments