Festival Posters

Lunar Eclipse : 8 नोव्हेंबरचे चंद्रग्रहण चिंता वाढवत आहे, 4 राशींना लाभाचे योग आणि 4 साठी नुकसान

Webdunia
गुरूवार, 27 ऑक्टोबर 2022 (15:58 IST)
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह आणि नक्षत्रांच्या बदलाप्रमाणेच ग्रहणाचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येतो, मग ते सूर्यग्रहण असो किंवा चंद्रग्रहण. ग्रहणानंतरचा एक महिन्यापर्यंतचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा आहे. यावरून आपण जाणून घेऊया की येणाऱ्या काळात ग्रहणाच्या प्रभावामुळे कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होतो आणि कोणत्या राशीच्या लोकांना नुकसान होते. वृत्तानुसार, 8 नोव्हेंबर 2022 रोजी होणारे वर्षातील शेवटचे ग्रहण 4 राशींसाठी मिथुन, कर्क, वृश्चिक आणि कुंभ राशीसाठी फायदेशीर ठरेल. त्याच वेळी, 4 राशी मेष, वृषभ, कन्या आणि मकर राशीसाठी नुकसान आणत आहेत. याशिवाय उर्वरित चार राशींना ग्रहणामुळे मध्यम फळ मिळेल.
 
कुठे दिसणार चंद्रग्रहण?
वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण भारतासह दक्षिण/पूर्व युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागरात दिसणार आहे.
 
चंद्रग्रहण वेळ (Chandra Grahan 2022 Time in India):  
वर्षातील शेवटचे ग्रहण कार्तिक पौर्णिमेला 8 नोव्हेंबर 2022 रोजी होईल. चंद्रग्रहणाची सुरुवात म्हणजेच स्पर्शकाल संध्याकाळी 5:35 वाजता सुरू होईल आणि ग्रहणाचा मध्य 6:19 वाजता असेल आणि मोक्ष 7:26 वाजता असेल. या ग्रहणाचा सुतक काल ग्रहणाच्या 12 तास आधी पहाटे 5. 53 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत राहील.

Edited by : Smita Joshi 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

108 names of goddess Lakshmi देवी लक्ष्मीची 108 नावे, शुक्रवारी जपा आणि कृपा‍ मिळवा

आरती शुक्रवारची

स्वामी भक्तांना वाढदिवसाच्या स्वामीमय शुभेच्छा

Christmas special recipe Plum cake ख्रिसमस फ्रूट केक

मार्गशीर्ष गुरुवार आरती श्री महालक्ष्मी देवीची

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

पुढील लेख
Show comments