Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

१५ जानेवारीला पुन्हा 'हा खेळ सावल्यांचा'

वेबदुनिया
बुधवार, 13 जानेवारी 2010 (18:43 IST)
ND
ND
ग् रहण हा खगोलीय अविष्कार अर्थात सावल्यांचा खेळ. या सहस्त्रकातील सर्वात जास्त कालावधीचे कंकणाकृती सुर् यग् रहण येत्या शुक्रवारी १५ जानेवारीला पौष अमावस्येला होत आहे. तब्बल साडे दहा मिनिटांसाठी हे ग् रहण केरळ, तामिळनाडू राज्यातील कन्याकुमारी, रामेश्र्वरम, तंजावर, मदुराई, नागरकोईल, तुतीकोरीन, थिरूवअनंतपुरम आदि ठिकाणाहून दिसणार आहे.

कन्याकुमारी व रामेश्र्वरम येथे १० मिनिटांपेक्षा अधिक कालावधीची कंकणाकृती प्रतिमा दिसणार असल्याने लाखो देशी- परदेशी विज्ञानप्रेमी ग्रहणाचे वारकरी या ठिकाणांना भेटी देणार आहेत. मुंबई - ठाण्यातून हेच सुर्यग्रहण ६५ टक्के खंडग्रास स्थितीत दिसेल. असा दुर्मिळ योग पुन्हा पुढच्या सहस्त्रकात २३ डिसेंबर ३०४३ रोजी येणार असल्याने सर्वात जास्त कालावधीचे हे सुर्यगप्रहण प्रत्येकाने सौरचष्म्यातून वा योग्य ती काळजी घेऊनच पहावे असे आवाहन खगोलतज्ञ मुकुंद मराठे यांनी केले आहे.

पृथ्वीच्या फार थोड्या प्रदेशावरून हे गप्रहण दिसणार असल्याने ही अत्यंत दुर्मिळ अशी वैज्ञानिक घटना आहे. चंद्राची कक्षा लंब वर्तुळाकार असल्याने त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर बदलत असते. अमावस्येचा चंद्र, पृथ्वी आणि सुर्याच्या मध्ये असतो. अशावेळी चंद्र जर का पृथ्वीपासून दूर असेल तर त्याची गडद सावली पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही. या स्थितीत चंद्रबिंबाचा कोनीय व्यास, सुर्य बिंबाच्या कोनीय व्यासापेक्षा लहान असतो. त्यामुळे पाहणार्‍यांच्या दृष्टीच्या पातळीत जरी बिंबाचे केंद्रबिंदू आले तरी चंद्रबिंबाच्या कडेने सुर्यबिंबाच्या वर्तुळाकार प्रकाशित भाग दिसत राहतो. एखादा गोलाकार ट्युबलाईट अथवा मोठ्या बांगडीत छोटे कंकण ठेवल्याप्रमाणे असे खगोलतज्ञ मराठे म्हणाले.

चंद्राची अवाढव्य सावली तशी ३९०० कि.मी. वेगाने पुढे पुढे ग्रहण पट्ट्यामध्ये सरकत जाते. सुमारे ३२० कि.मी.च्या रूंदीच्या पट्ट्यामध्ये हे ग्रहण कंकणाकृती दिसेल. मात्र उर्वरीत भारतातून तसेच ठाणे - मुंबईतून खंडगप्रास सुर्यगप्रहणाचा अविष्कार होणार आहे. ठाण्यातून ग्रहणस्पर्श ११ः१६ः३९ सेकंद ते ग्रहणस्थिती दुपारी ०१ः१८ः०९ आणि ग्रहण समाप्ती ३ वाजून ४ मिनीटे ३१ सेकंद या कालावधीत ६५ टक्क्यापर्यंत सुर्यग्रहण दिसेल.

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

आरती बुधवारची

रांजणगावाचा महागणपती

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

4 मे रोजी Varuthini Ekadashi 2024 व्रत, जाणून घ्या कशी करावी भगवान विष्णूची पूजा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments