Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठी निबंध :माझा आवडता खेळ बॅडमिंटन

Webdunia
सोमवार, 13 डिसेंबर 2021 (22:42 IST)
आजच्या काळात बॅडमिंटन हा खेळ भारतासह जगभरात लोकप्रिय आहे. या खेळाला आशिया खंडातील बऱ्याच देशात खेळला जातो. या खेळाला आता ऑलम्पिक मध्ये देखील स्थान देण्यात आले आहे. या खेळाला मराठीत फूल-बॅट असे ही म्हणतात. चला या खेळा विषयी माहिती जाणून घेऊ या. 
बॅडमिंटन हा चार भिंतीच्या आत खेळला जाणारा खेळ आहे. ह्या खेळाला बंद खोलीत या साठी खेळले जाते कारण खेळामध्ये जे शटलकॉक वापरले जाते, ते खूप हलके असते व हवेच्या वेगाने ते इकडे तिकडे वळू शकते. पण आपण याला मोकळ्या मैदानात पण खेळू शकतात.याला खेळल्याने शरीरात रक्तस्त्राव व्यवस्थित होतो. ज्या मुळे हृदय संबंधी रोग दूर होतात.  
बॅडमिंटन खेळण्यासाठी 2 खेळाडूची आवश्यकता असते, या सोबतच दोन रॅकेट आणि एक शटलकॉक पण लागतात. दोघी बाजूंना समान मैदान दिले जाते, मध्ये एक जाळी नेट म्हणून बसविण्यात येते. रॅकेट च्या मदतीने शटलकॉक ला इकडून तिकडे मारले जाते. ज्याच्या मैदानात शटलकॉक पडले त्याची हार होते हा खेळ  खेळायला जास्त जागा लागत नाही व यात दुखापत होण्याची शक्यता पण कमीच असते
 
इतिहास -
बॅडमिंटन खेळाची सुरुवात नेमकी कुठून झाली हे सांगता येत नाही. परंतु काही इतिहासकारांचे मत आहे की भारतात 1500 बीसी मध्ये बॅडमिंटन खेळले जायचे. त्या काळात या खेळाला 'पुना' म्हटले जायचे. कारण या खेळाची सुरुवात पुणे शहरातून झाली होती. 
सन 1870 मध्ये भारतात कार्यरत असलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यां द्वारे या खेळाला भारता बाहेर नेण्यात आले. असे मानतात की DUKE OF BEAUFORT ज्यांना बॅडमिंटन खेळाचे जनक मानले जाते त्यांनी सर्वात आधी आपल्या मित्रांसोबत हा खेळ खेळला होता.
रॅकेट च्या मदतीने खेळल्या जाणाऱ्या खेळांमध्ये बॅडमिंटन हा सर्वात गतिशील खेळ आहे. या खेळात शटल कॉक ची गती 300 किलोमीटर प्रति तासा पर्यंत असू शकते. 
जगभरातील सर्वात जास्त खेळल्या जाणाऱ्या खेळामध्ये बॅडमिंटन हा दुसऱ्या क्रमांकाचा प्रसिद्ध खेळ आहे. या यादीत प्रथम क्रमांकावर फुटबॉल आहे. 
सन 1992 मध्ये बॅडमिंटन ला पहिल्यांदा ओलंपिक मध्ये समाविष्ट करण्यात आले होते.
बॅडमिंटन चा प्रथम सामना बार्सिलोना मध्ये खेळण्यात आला होता. ज्या सामन्याला एक अरब पेक्षा जास्त लोकांनी टीव्ही वर पाहिले होते.
आधीच्या काळात चीनमध्ये पायाने badminton खेळण्याची पद्धत होती. त्या काळात या खेळाला Ti Zian म्हटले जायचे. या खेळात खेळाडू रॅकेट ऐवजी आपल्या पायाने शटल कॉक ला मारायचे.
आधीच्या काळात तसेच काही ठिकाणी आजही बॅडमिंटन च्या शटल कॉक ला बनवण्यासाठी बदकाचे पंख वापरले जातात. 
बॅडमिंटनच्या रॅकेट चे वजन 4 ग्राम ते 5 ग्रॅमपर्यंत असते . 
आजपर्यंतचे सर्वात लहान बॅडमिंटन सामना सहा मिनिटांचा होता. ज्याला कोरिया आणि इंग्लंड च्या मध्ये खेळण्यात आले होते. 
जगातील सर्वात मोठा बॅडमिंटनचा  सामना डेन्मार्क व चीन मध्ये खेळण्यात आला होता. हा सामना 124 मिनिटे चालला होता.
बॅडमिंटनच्या खेळात सर्वात जास्त यश मिळवणाऱ्या देशांमध्ये चीन आणि इंडोनेशिया पुढे आहेत. 
विश्व बॅडमिंटन संघाची स्थापना 1934 मध्ये करण्यात आली, त्याकाळी यामध्ये फक्त 9 देश सहभागी होते, परंतु आज जगभरातील 150 देश यात सहभागी आहेत.
बॅडमिंटन खेळण्यासाठी रॅकेट व शटल कॉक ची आवश्यक असते. शटल कॉक ला बॅडमिंटनचे फुल देखील म्हटले जाते. हे फुल कुत्रिम तऱ्हेने बनवले जाते. या फुलामध्ये 16 पंख लावले जातात. याचे वजन फक्त 4-5 ग्रॅम असते.
 
बॅडमिंटन खेळण्यासाठी एका आयताकृती मैदानाला वापरले जाते. या मैदानाला मधोमध जाळी लावून दोन भागात विभागले जाते. या मैदानाला कोर्ट म्हटले जाते. कोर्टची रुंदी 6.1 मीटर किंवा 20 फूट असते. सिंगल मॅच च्या वेळेस या मैदानाला 5.18 मीटर केले जाते. जाळी पासून 1.98 मीटर दूर सर्विस लाईन बनवली जाते.
 
नियम -
*  या खेळात दोन खेळाडूंद्वारे शटल कॉक इकडून तिकडे फेकली जाते. जर एखाद्या खेळाडू कडून शटल कॉक फेकण्यात चूक झाली तर त्याचे पॉईंट्स विरुद्ध खेळाडूला मिळतात. 
* हा खेळ 21 पॉईंट्स चा असतो. प्रत्येक मॅच तीन भागात विभागतात. ज्या खेळाडूला सर्वात अधिक अंक मिळतात तो खेळाडू जिंकतो. 
* हा खेळ 29 पॉईंट्स  पर्यंत सुरु ठेवतात. 29 पॉईंट्स नंतर गोल्डन पॉईंट्स असतात. जो खेळाडू या पॉईंट्स ला जिंकतो तो विजेता बनतो. 
 
 फायदे -
बॅडमिंटन खेळण्याचे अनेक शारीरिक व मानसिक फायदे देखील आहेत:
1 शारीरिक क्षमता वाढते -
बॅडमिंटन खेळाचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे हा खेळ खेळाडूची शारीरिक क्षमता वाढवतो. व्यक्तीच्या 
स्नायूंना बळकट करतो. बॅडमिंटन च्या खेळात इकडून तिकडे पळत राहावे लागते. ज्यामुळे शरीराचा स्टॅमिना वाढतो.
 
2 हृदयरोगाचा धोका कमी होतो -
बॅडमिंटनमधील लगातार हालचालीमुळे हृदय मजबूत होते. हृदयाला योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होतो. ज्यामुळे व्यक्‍ती निरोगी राहून हृदयरोगाचा धोका कमी होतो. 
3 मानसिक तणाव कमी होतो- या खेळाला खेळल्याने शरीरात ताण निर्माण करणारे हार्मोन्स कमी होतात. 
4 शरीराची लवचीकता वाढते-
बॅडमिंटनमध्ये उड्या मारून शटल कॉक ला मारल्यामुळे पाठीचा कणा लवचिक होतो. व यामुळे शरीराची लवचीकता वाढते.
5 डायबिटीज चा धोका कमी होतो.
6 मेटॅबॉलिझम (चयापचय) वाढते.
7 हात व पायांची हाडे मजबूत व बळकट बनतात.
8 विचार करण्याची क्षमता वाढते.
9 वजन कमी करण्यात सहाय्यक आहे.
10 सामाजिक अस्तित्व निर्माण करते.
 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

Career in Master of Applied Management : मास्टर ऑफ अप्लाइड मॅनेजमेंट मध्ये करिअर करा

अचानक ब्लड प्रेशर वाढल्यास हा योगाभ्यास करणे

चविष्ट आलू जलेबी

Bra Wearing Benefits रोज ब्रा घालण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर बनून करिअर करा, पात्रता जाणून घ्या

पुढील लेख
Show comments